esakal |  नांदेड : गणेश विसर्जनाला गालबोट, दोघांचा साठवण तलावात बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तालुक्यातील नवीन अंधेगांव येथील रामजी हुसेन्ना  यमलवाड यांचा जावई  शेखर पोशट्टी मादसवार वय 35 वर्षे  रा. पांगरपहाड ता. मुधोळ जि. निर्मल  ( तेलंगणा ) हा आपल्या सासुरवाडी आदेगाव  येथे आला होता.

 नांदेड : गणेश विसर्जनाला गालबोट, दोघांचा साठवण तलावात बुडून मृत्यू

sakal_logo
By
प्रकाश जैन

हिमायतनगर : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (lता. एक) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दरेसरसम साठवन तलावात घडली. 

तालुक्यातील नवीन अंधेगांव येथील रामजी हुसेन्ना  यमलवाड यांचा जावई  शेखर पोशट्टी मादसवार वय 35 वर्षे  रा. पांगरपहाड ता. मुधोळ जि. निर्मल  ( तेलंगणा ) हा आपल्या सासुरवाडी आदेगाव  येथे आला होता. दि. 1 मंगळवारी सायंकाळी नवीन अंदेगांव येथून गणपती विसर्जनासाठी दरेसरसम येथील साठवण तलावात उतरला असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

सासरवाडीत जावयाचा मृत्यू

सासुरवाडी नविन आदेगाव आलेल्या जावयाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने गांवकर्यावर शोककळा पसरली आहे. मयत शेखर मादसवार यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील असा परिवार आहे. दि. 2 बुधवारी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे शवविच्छेदन करूण प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काँ. हेमंत चोले हे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा नांदेड : निष्ठावान शिवसैनिक कोरोनाने हिरावला, लोहा शहरावर शोककळा

येहळेगाव शिवारात खदानीतील पाण्यात बुडून गणेश भक्ताचा मृत्यू 

अर्धापूर- तालुक्यातील येळेगाव शिवारात असलेल्या खदानीवर गणेश विसर्जनासाठी गेलेल्या धनराज चांदू जाधव (वय 21) हा विसर्जन करतेवेळेस त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. एक) दुपारी बाराच्या सुमारास घडली. चांदू देवराव जाधव रा. येहळेगाव यांच्या माहितीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार डी. एस. राठोड करत आहेत.