esakal | नांदेड : अर्धापूर येथील नगरपंचायतमधील दोघेजण लाचेच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एका निरिक्षकासह दोघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात शुक्रवारी (ता. १४) दुपारी अडकले

नांदेड : अर्धापूर येथील नगरपंचायतमधील दोघेजण लाचेच्या जाळ्यात

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : विवाह नोंदणी प्रमाणत्रासाठी पाचशे रुपये लाच घेणाऱ्या नगरपंचायत कार्यालयातील एका निरिक्षकासह दोघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात शुक्रवारी (ता. १४) दुपारी अडकले. या दोघांविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अर्धापूर नगरपंचायतमध्ये खळबळ उडाली आहे. 

अर्धापूर (जिल्हा नांदेड) येथील नगरपंचायतमध्ये असलेल्या विवाह नोंदणी विभागात तक्रारदार आपल्या बहिणीचे विवाह नोंदणी प्रमाणत्र मिळावे यासाठी धाव घेतली. त्यासाठी त्याने सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करुन विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी तो नगरपंचायत कार्यालयात गेला. मात्र या कामासाठी लाचखोर निरीक्षक बालाजी गणपतराव हराळे (वय ५४) याने प्रमाणपत्र फीस म्हणून ५०० रुपये व लाच स्वरुपात ५०० रुपये असे एक हजार रुपये मागितले. परंतु ही लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात ता. १३ आॅगस्ट रोजी तक्रार दिली. यानंतर पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच मागणी पडताळणी सापळा शुक्रवनारी (ता. १४) सकाळी लावला. यावेळी ५०० रुपये लाच घेताना निरीक्षक श्री. हराळे आणि त्यांचा सेवक बालाजी चांदु पाटोळे या दोघांना रंगेहात पकडले. 

हेही वाचा -  कोरोना रूग्णांसाठी उपाययोजना करा- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

५०० रुपयाची लाच घेताना अडकले

यानंतर पोलिस निरीक्षक कपील शेळके यांनी पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील. पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सहकारी जगन्नाथ अनंतवार, एकनाथ गंगातिर्थ, गणेश केजकर, शेख मुजीब, विलास राठोड आणि सचीन गायकवाड यांना यांना सोबत घेऊन अर्धापूर नगरपंचायत परिसरात लावलेल्या सापळ्यात निरीक्षक बालाजी हराळे आणि सेवक बालाजी पाटोळे यांना पाचशे रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. अडकला. या प्रकरणी कपील शेळके यांच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image