esakal | नांदेड : दुचाकीस्वार चोरटे सैराट, शहरातील तीन महिलांचे गंठण लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या घटनांमुळे पुन्हा एकदा दुचाकीस्वार सक्रीय झाल्याने पोलिस यंत्रणाही भांभावून गेली असून वाढत्या घटनांमुळे महिला वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

नांदेड : दुचाकीस्वार चोरटे सैराट, शहरातील तीन महिलांचे गंठण लंपास

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : ऐन दिवाळीत शहराच्या वेगवेगळ्या भागात तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण अनोळखी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी लंपास केले. या घटनांमुळे पुन्हा एकदा दुचाकीस्वार सक्रीय झाल्याने पोलिस यंत्रणाही भांभावून गेली असून वाढत्या घटनांमुळे महिला वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनांची नोंद भाग्यनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

शहरातील मंत्रीनगर भागात राहणाऱ्या मनिषा संजय मेडेवार या सकाळी सात वाजेच्या सुमारास काकड आरती करुन घराकडे आपल्या मैत्रीणीसोबत पायी जात होत्या. यावेळी त्यांच्या मागून दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३८ हजार रुपये किमतीचे गंठण हिसकावून पळ काढला. यावेळी श्रीमती मेडेवार यांनी आरडाओरडा केला परंतु तोपर्यंत चोरटे सुसाट वेगाने प्रसार झाले.

भाग्यनगर पोलिस ठाण्यात या घटनांची तक्रार

त्यानंतर काही वेळातच शेजारील भावसार चौक परिसरातील गल्लीतील गोदावरी रत्नपारखे राहणार जंगमवाडी आणि प्रीती प्रदीप वहीनकर ह्या दोघी काकड आरती करुन पायी घराकडे जात होत्या. त्यांना गाठून अनोळखी दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी अशाच पद्धतीने हिसकावले. या प्रकरणात भाग्यनगर पोलिस ठाण्यात या घटनांची तक्रार देण्यात आली. यानंतर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. बोनवाड करत आहेत.

हेही वाचा  Good News:नांदेड- पनवेल- नांदेड उत्सव विशेष गाडीला मुदतवाढ -

भितीचे वातावरण पसरले

दरम्यान शहरात लाॅकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर लुटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी हे चोरटे एकट्यात असलेल्या वृद्ध तसेच महिलांना लक्ष्य करत आहेत. दुचाकीवरुन डबल आणि ट्रिपल सीट बसुन महिलांच्या गळ्यातील दागिने, हातातील मोबाईल पर्स हिसकावून पळ काढत आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

जुना कौठा परिसरातील मामा चौकात महिलेचे दागिने लंपास

या भागातील एका खासगी रुग्णालयातून त्या मामा चौकमार्गे आपल्या घराकडे जात होत्या. याळी मामाचौक दरम्यान त्या महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोण्याचे गंठण अनोळखी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावून तोडून पळविले. ही घटना ता. १६ नोव्हेंबरच्या सकाळी आठच्या सुमारास घडली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. संध्या विष्णुपुरीकर रा. पावडेवाडीनाका यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार शेख जावेद करत आहेत.