
रस्ता नसल्यामुळे आत्तापर्यंत गावात एस. टी. बस पोहचलीच नाही. यामुळे या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.
नांदेड : वरुला ते निवघा रस्त्याने करावी लागते कसरत; रस्ता नसल्याने गावात एस. टी. बसचे दर्शनच नाही
निवघाबाजार ( जिल्हा नांदेड ) : हदगाव तालुक्यातील वरुला ते निवघा बाजार जाणाऱ्या जोड रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने येथिल नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याने शाळेतील विद्यार्थी, कामगार वर्ग, शेतकरी यांची नेहमी वर्दळ असते. या उखडलेल्या रस्त्यावर वाहनचालकांना आपला जिव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. भविष्यात या कारणामुळे अपघात होवुन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता नसल्यामुळे आत्तापर्यंत गावात एस. टी. बस पोहचलीच नाही. यामुळे या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.
येथून जवळच असलेलं वरुला (ता. हदगांव) हे छोटंस गाव. गावची लोकसंख्या जेमतेम आठसे ते एक हजार, गटग्रामपंचायत महाताळा असल्याने ग्रामपंचायत सदस्यांची संख्या अवघे तिन. तर महाताळा येथील सदस्य संख्या चार. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावात आतापर्यंत एस..टी..पोहचलीच नाही..सनासुदीत यांच्याकडे वाहनाची व्यवस्था आहे असे आपल्या वाहणावर बोळवन आणतात. ज्यांच्याकडे वाहन नाही अशाना पैदल बोळवन आनावी लागते. अशा अनंत अडचणीना ग्रामस्थाना सामोरे जावे लागते. येथील रस्ता पुर्ण पणे उखडून गेल्याने त्यावर साधी दुचाकीही चालवीने कठीण झाले आहे.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलता; 15 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी- डाॅ. विपीन
गावातील एखादा व्यक्ती आजारी झाला तर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात कसे न्यायचे हा प्रश्न येथील नागरिकांसमोर आ वासुन उभा आहे. रस्ता नसल्याने आत्तापर्यंत गावात एसटी बस गेली नाही. तर अवैध अॅटो किंवा कोणतेच वाहन जात नसल्याने नाईलाजास्तव ग्रामस्थांना पैदल निवघा येथे चार कि.मी. यावे लागते. गेल्या अनेक दिवसापासून येथील नागरीकानी लोकप्रतिनिधीकडे सस्त्याची मागणी केली. परंतू कोणीही याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थ करित आहेत. अजूनपर्यंत या मागणीकडे संबंधित विभागाकडून लक्ष न देता साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. आता संबंधित प्रशासनाने जागे होऊन तातडीने ह्या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर ग्रामस्थांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांपासून वरुला ते निवघा रस्ता मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले. या रस्त्यावरुन जातांना नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मी या समस्येबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधला असता या जोड रस्त्यासाठी सात लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध असल्याचे समजले. संबधित गुत्तेदाराने तात्काळ काम चालू करुन ग्रामस्थांना या जीवघेण्या समस्येपासून मुक्त करावे अन्यथा ग्रामस्थांना घेवुन तिव्र आंदोलन छेडु.
- अविनाश भोयर, उपसरपंच वरुला- महाताळा.
संपादन- प्रल्हाद कांबळे
Web Title: Nanded Varula Has Do It Road There No Road Village St There No Sight Bus
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..