नांदेडमधील मतदारांना आधार लिंकसाठी आठ केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Linking Of aadhar & voter ID latest marathi news

नांदेडमधील मतदारांना आधार लिंकसाठी आठ केंद्र

नांदेड : नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जास्त मतदार नांदेड शहरात वास्तव्यास आहेत. महसूल प्रशासन व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणी बाबत शहरातील मतदारांसाठी रविवारी (ता. २५) शहरात महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत एकूण आठ ठिकाणी मतदार ओळखपत्रास आधार लिंक करण्यासाठी मतदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शहरी भागातील मतदारांनी आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले आहे. या आठही ठिकाणी महापालिकाचे वसूली लिपिक, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत बसणार आहेत.

मतदारांनी निवडणूक ओळखपत्र व आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. शिवाय मतदार स्वतः घरबसल्या ठिकाणी आपल्या अॅड्राईड फोनमध्ये वोटर हेल्पलाईन अॅप डाउनलोड करून सुद्धा फार्म क्रमांक सहा ‘ब’ भरून आपली आधार जोडणी करू शकतात, अशी माहिती तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली. सर्व मतदारांनी सदर अॅपद्वारे आपली आधार जोडणी करून आपले मतदार यादीतील नाव सुनिश्चित करावे व दुबार नावे वगळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करून मतदार यादी प्रमाणिकीकरणासाठी आधार लिंक करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

या शिबिराच्या नियोजनासाठी क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव, डॉ. मिर्झा बेग, रावण सोनसळे, राजेश चव्हाण, रमेश चवरे, डॉ. रईसोद्दीन, मंडळ अधिकारी अनिरूद्ध जोंधळे, आर. डी. शिंदे, म्हेत्रे, नांदेडकर आदींसह तलाठी गाढे, भांगे, सय्यद मोहसीन आदी सहभागी असल्याची माहिती तहसीलदार किरण अंबेकर नांदेड यांनी दिली.

या ठिकाणी आहेत केंद्र

१) तरोडा खुर्द भागासाठी ः शिवपार्वती मंगल कार्यालयासमोर

२) तरोडा बुद्रुक व सांगवी ः साई मंदिरासमोर

३) अशोकनगर भागासाठी ः अशोकनगर कार्यालय, वर्कशॉप

४) गणेशनगर भागासाठी ः विजयनगर मंगल कार्यालय, हनुमान मंदिराजवळ.

५) वजीराबाद भागासाठी ः वजिराबाद क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाजवळ

६) देगलूर नाका भागासाठी ः हैदराबाद दवाखान्याजवळ

७) इतवारा भागासाठी ः चौफाळा पोलीस चौकीजवळ

८) सिडको हडको भागासाठी ः कामगार कल्याण केंद्र परिसर