नांदेड : महिलेचा शॉक लागल्याने मृत्यू, मृतदेह महावितरणच्या दारात

file photo
file photo

नांदेड : छतावरील गहू काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेला विद्यूत पुरवठा करणाऱ्या तारांचा स्पर्श झाला. यात ती गंभीर भाजली होती. तिच्यावर हिमायतनगर येथे प्राथमीक उपचार करुन पुढी उपचारासाठी तिला नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा बुधवारी (ता. २१) तब्बल सहा दिवसांनी मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी मृतदेह महावितरणच्या कार्यालयात नेण्यात आला. महावितरणने विश्‍वास दिल्यानंतर सदरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिमायतनगर येथील नजमा बेगम ह्या आपल्या परिवारासह राहतात. त्यांच्या छतावर पाच फुट उंचीच्या अंतरावर पुढे गेलेल्या १३२ केव्ही विज पुरवठा तार आहे. शहरातील उमरचौक परिसरात नजमा बेगम शेख बशीर या महिलेने शुक्रवारी (ता. १६) ऑक्टोबर रोजी छतावर गहू वाळवायला ठेवले होते. दरम्यान सायंकाळी सव्वापाच वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. छतावरील गहू भिजू नये म्हणून एकत्र करुन ती गाठोड्यात खाली घेऊन येत होती. यावेळी तिचा स्पर्श घरावरून सरसमकडे जाणाऱ्या १३२ केव्ही वीजपुरवठा लाईनला झाला. यात तिला जबर विद्यूत शॉक लागून नसीमा बेगम जखमी झाली. तिच्यावर हिमायतनगरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी (ताय २१) मध्यरात्री तिचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

तिच्या मृत्यूस महावितरणचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचे सांगून नातेवाईकांनी तिचे पार्थीव थेट महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात आणून ठेवले. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रफीक, माजी जि. प. सदस्य समदखान, जफर लाला आदींच्या शिष्टमंडळाने महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता पंडित राठोड यांची भेट घेतली. तसेच घरावरून गेलेल्या विजेच्या तारा तातडीने काढण्यात याव्यात आणि मयताच्या कुटुंबियांना महावितरण कंपनीने मदत घ्यावी अशी मागणी केली. यावेळी उपकार्यकारी अभियंता राठोड यांनी आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्य सल्ल्यानुसार वीज लाईन हटविण्याचे व वीज वितरण कंपनीकडून लवकर आर्थीक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर महावितरणच्या दारातील पार्थीव अंत्यविधीसाठी नेण्यात आले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com