नांदेड चिंता वाढली : ‘ऑक्सिजन' कमतरतेमुळे रुग्णालयेच ‘ऑक्सिजन'वर 

प्रल्हाद कांबळे
Sunday, 13 September 2020

गंभीर रुग्णांना रेमडेसिवर यासह प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधी द्यावी लागतात. त्यासोबतच आॅक्सिजन पुरवावा लागतो. मात्र रुग्णालयात मागणी प्रमाणे आॅक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांना त्याचा फटका बसत आहे.

नांदेड : शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांना आॅक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. गंभीर रुग्णांना रेमडेसिवर यासह प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधी द्यावी लागतात. त्यासोबतच आॅक्सिजन पुरवावा लागतो. मात्र रुग्णालयात मागणी प्रमाणे आॅक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. एवढेच नाही तर आॅक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने रुग्णालयेच आॅक्सिजनवर असल्याचे पहावयास मिळत आहे. 

ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने रुग्णालयांची सध्या कसरत सुरू असून अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास रुग्णांना दाखल करून घेणे हे या रुग्णालयांना अवघड जाणार आहे. आॅक्सिजनचा तुटवडा कशामुळे निर्माण होत आहे, उत्पादन कमी आणि मागणी वाढली काय, किंवा ऑक्सिजन तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनाचा पुरवठा कमी होतोय का अशा विविध कारणांचा शोध घेऊन प्रशासनाने हा विषय तातडीने सोडविण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असताना शहरातील रुग्णालयासमोर नवे संकट उभे राहिले आहे.

हेही वाचाखा. हेमंत पाटील यांच्या पत्राने आरोग्य व महापालिका प्रशासनाला घाम, काय आहे पत्रात ?

वैद्यकीय वापराशिवाय उद्योग व अन्य कारणांसाठी ऑक्सिजन देऊ नये 

कोरोना बाधित रुग्णांच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत असल्याने त्यांना बाहेरून आॅक्सिजन देण्याची वेळ येत आहे. काही गंभीर रुग्णाला तर खूप मोठ्या प्रमाणात आॅक्सिजनची गरज असते. अशा अवस्थेत रुग्णालयांना आवश्यक व पुरेसा पुरवठा होण्याची गरज असताना अनेक रुग्णांना रुग्णालयात याची कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाने महिनाभरापूर्वी वैद्यकीय वापराशिवाय उद्योग व अन्य कारणांसाठी ऑक्सिजन देऊ नये अशा सूचना ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादारांना दिल्या आहेत. मात्र वाढत्या रुग्णसंख्ये बरोबर आता ऑक्सिजनची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरातील अनेक रुग्णालये त्यांना आवश्यकतेप्रमाणे लागणाऱ्या ऑक्सिजनची ऑर्डर देत असले तरी त्यांना नेमके ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येते. 

येथे क्लिक करालग्नापुर्वीच महिमा होती गर्भवती; उद्योगपतीसोबत होतं प्रेमसंबंध


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded worries: Oxygen shortage at hospital due to lack of oxygen Nanded news