नांदेड : नऊ हजार वृक्षांची आज एकाचवेळी लागवड

जिल्हा परिषदेतर्फे नियोजन; सीईओ वर्षा ठाकूर - घुगे यांचा उपक्रम
Nanded Zilla Parishad Nine thousand trees plantation
Nanded Zilla Parishad Nine thousand trees plantationsakal

नांदेड : वटपौर्णिमेनिमित्त मंगळवारी जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामपंचायत परिसरात सुमारे नऊ हजार १७६ वडवृक्ष लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेतंर्गत जिल्ह्यात एकाच वेळी लावण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील तीन हजार ७३९ शाळा, अंगणवाडी - तीन हजार ७७५, प्राथमिक आरोग्य केंद्र ६८, उपकेंद्र ३७९ व एक हजार ३१० ग्रामपंचायतीमधून सुमारे नऊ हजार १७६ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

गट विकास अधिकारी यांच्यासह नियंत्रणात गट शिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता, विस्‍तार अधिकारी यांच्यासह तालुकास्तरावरील खातेप्रमुखांनी त्यांच्या विभागाची जबाबदारी घेऊन वृक्ष लागवड करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर-घुगे ह्या उपक्रमशील अधिकारी असून त्यांनी अनेक नवउपक्रम जिल्‍ह्यात राबविले आहेत.

वटपौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात एकाच वेळी सुमारे नऊ हजार वृक्षांची लागवड पहिल्यांदाच केली जात आहे. या नाविन्‍यपूर्ण उपक्रमामुळे गावागावात वडाची लागवड केली जाणार आहे. आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो. या शिवाय वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशे बारा किलो ह्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडते. त्यामुळे ही झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com