सीटूच्या थाळी नाद आंदोलनाने नांदेड जिल्हा परिषद दणाणली; संप मिटला

सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशी नुसार आशांना दरमहा अठरा हजार रूपये व गट प्रवर्तकांना दरमहा बावीस हजार रूपये मानधन देण्यात यावे.
नांदेड- थाळीनाद आशांचा संप मिटला,
नांदेड- थाळीनाद आशांचा संप मिटला,

नांदेड : सीटू संलग्न अशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने नांदेड जिल्हा परिषदेसमोर चार तास धाळी नाद करीत हजारो आशा व गट प्रवर्तकांनी केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरीत निषेधात्मक घोषणाबाजी केली. ता. १५ जूनपासून आशा व गट प्रवर्तकांचा राज्यव्यापी संप सुरु असून काही प्रमुख मागण्या मंजूर करण्यात आल्यामुळे सुरु असलेला संप तात्पुरता मागे घेण्यात आला असल्याचे संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार यांनी घोषित केले.

या आंदोलनामध्ये कॉ. विजय गाभणे व सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. जि. प. सदस्या प्रणिता देवरे आणि साहेब धनगे यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला व सभागृहात आशा व गट प्रवर्तक ताईंचे प्रश्न मांडले. बुधवारी (ता. २३) झालेल्या तीव्र आंदोलनात खालील मागण्या करण्यात आल्या असून आरोग्य अभियानाचे समन्वयक सिध्दार्थ थोरात व डॉ. रूईकर यांनी जि. प. चे प्रतिनिधी म्हणून शासनाची भूमिका मांडली.

हेही वाचा - मॅनेजर व असिस्टंट मॅनेजर पद भरतीसाठी महामेट्रोचे नोटीफिकेशन जाहीर

सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशी नुसार आशांना दरमहा अठरा हजार रूपये व गट प्रवर्तकांना दरमहा बावीस हाजार रूपये मानधन देण्यात यावे. नांदेड शहरात व जिल्ह्यात जनसंख्येच्या आधारावर तातडीने नवीन भरती करावी व गट प्रवर्तक पदासाठी आशांना प्राधान्य देण्यात यावे. गट प्रवर्तक ताईंचे सॉफ्टवेअरचे रूपये दोनशे पन्नास थकीत असून ते अदा करावेत. गट ताईंचा गणवेश कलर बदलण्यात यावा. ग्राम पंचायत कडून मिळणारा दरमहा कोविड भत्ता देण्यात यावा. आशा व गट ताईंना प्रत्येक आरोग्य उप केंद्रात मंजूर असलेला कक्ष देण्यात यावा. अनेक ठिकाणी परिचारीकाकडून आशांना स्वाक्षरी साठी अडवनूक होत आहे संबंधितांना समज द्यावी व आशांना सहकार्य करावे. निवडणूक काळात आशांनी काम केले आहे त्यांचा निवडणूक भता अदा करावा. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानामध्ये आशांनी सर्वेक्षणाचे काम केले आहे त्या कामाचा मोबदला देण्यात आला नाही तो तात्काळ देण्यात यावा. या मागण्यासह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.

येथे क्लिक करा - उपोषणकर्त्यांची पोलिसांना मारहाण; उमरी येथील घटना

राज्य कृती समितीची सह्याद्री अतिथी गृहावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सोबत यशस्वी बैठक आज झाली असून आशांना दरमहा मुळवेतनवाढ एक हजार रुपये व कोविड काळासाठी पाचशे रुपये व गट प्रवर्तक ताईंना मुळवेतधवाढ बाराशे रुपये व कोविड काळासाठी पाचशे रुपये दरमहा वाढ करण्यात आल्याचे सरकारच्या वतीने जाहीर केल्यामुळे मागील आठ दिवसापासून सुरु असलेला संप मागे घेण्यात येत असल्याचे फेडरेशनच्या वतीने जाहीर करण्यात आले व आंदोलनाची सांगता करण्यात आली.

आंदोलनाचे नेतृत्व कॉ. उज्वला पडलवार, कॉ. विजय गाभणे, कॉ. गंगाधर गायकवाड यांनी केले तर आंदोलन यशस्वीतेसाठी कॉ. शीला ठाकूर, कॉ. सारजा कदम, कॉ. वर्षा सांगडे, जयश्री मोरे, सुनिता पाटील, कॉ. मारोती केंद्रे, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ. शेख मगदूम पाशा, द्रोपदा पाटील, रेखा धुतडे, शरयू कुलकर्णी आदींनी प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com