नांदेड : आत्मविश्वासाची पावले जेव्हा शाळेत उमटतात...

पहिले पाऊल उपक्रम; जिल्हा परिषदेचा पुढाकार
Nanded Zilla Parishad school starts
Nanded Zilla Parishad school startssakal

नांदेड : शालेय शिक्षणात मानवी मूल्यांच्या संवेदना घेऊन शालेय विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी कसे वागावे, याबाबत आजवर विदेशी उदाहरणांची जोड द्यावी लागत होती. याला नांदेड जिल्ह्यातील एका अभिनव उपक्रमाने छेद देत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांनी आज आत्मविश्वासाचा नवा मापदंड विकसित केला. एरवी शाळेतील पहिले पाऊल म्हणून पालकांसह विद्यार्थ्यांच्या मनातही प्रचंड घालमेल असते. मुले शाळेची वास्तू पाहून काही ठिकाणी घाबरून रडायलाही लागतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या पहिल्या पाऊलांना शाळेत ताटातील कुंकवाच्या पाऊलाने ओले करून त्याचा ठसा तो ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गाच्या भिंतीवर ठेवत नवा आत्मविश्वास देण्याचा अभिनव प्रयोग आज संपूर्ण जिल्हाभर राबविला.

मुलांच्या मनात असलेली भीती दूर करणे, शिक्षकांच्या प्रती त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे ही आवश्यक बाब आहे. एरवी ती दुर्लक्षित असते. याबाबत आम्ही सर्वांनी शांततेत विचार करून मुलांच्या व शिक्षकांच्याही मनात नवा विश्वास निर्माण करता यावा, या दृष्टीने हा अभिनव उपक्रम घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिली. मागील आठवडाभर त्यांनी प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांशी, शिक्षक विभागातील अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा करून हा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले.

हदगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या देशमुखवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांनी आज मुलांसोबत एक तास घेतला. या शाळेत आदिवासी अंध समाजातील ३० मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या मनात विश्वास जागविण्यासमवेत त्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात स्वखर्चाने या मुलांना दप्तराचीही भेट देऊन आपली वैयक्तिक कृतज्ञतेचा प्रत्यय दिला. दरवर्षी वाढदिवसानिमित्तचा आजवर जपलेला एक पायंडा त्यांनी या आदिवासी मुलांसोबत साजरा केला.

सव्वातीन लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

जिल्हाभरात बुधवारी सुमारे तीन लाख ३३ हजार ९१२ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटण्याच्या उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. समग्र शिक्षा अंतर्गत पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शाळा, समाज कल्याण, महापालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित असा एकुण दोन हजार ९०९ शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com