esakal | नांदेडकरांनो सावधान : कोरोना आपला फास आवळत आहे; जिल्ह्यात 90 व्यक्ती कोरोना बाधित 

बोलून बातमी शोधा

file photo}

नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी केले आहे. कारण कोरोना पुन्हा एकदा आपला फास आवळत असल्याने खबरदारी घेणे हाच उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेडकरांनो सावधान : कोरोना आपला फास आवळत आहे; जिल्ह्यात 90 व्यक्ती कोरोना बाधित 
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : रविवार (ता. 28) फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 90 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 52 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 38 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  50 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी केले आहे. कारण कोरोना पुन्हा एकदा आपला फास आवळत असल्याने खबरदारी घेणे हाच उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.

रविवारी (ता. २८) एक हजार 835 अहवालापैकी एक हजार 721 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 654 एवढी झाली असून यातील 22 हजार 275 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 567 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 17 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 598 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

रविवारी झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 21, मुदखेड तालुक्यांतर्गत 1, गोकुंदा कोविड रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 12, खाजगी रुग्णालय 9, हदगाव कोविड रुग्णालय 1 असे एकूण 50 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.17 टक्के आहे.  

रविवारी बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 38,  बिलोली तालुक्यात 1, देगलूर 1, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 7, उमरी 1, कंधार 1, परभणी 1 असे एकुण 52  बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 21, भोकर तालुक्यात 3, माहूर 4, नांदेड ग्रामीण 2, किनवट 8 असे एकूण 38 बाधित आढळले.

जिल्ह्यात 567 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 61, किनवट कोविड रुग्णालयात 25, मुखेड कोविड रुग्णालय 12, हदगाव कोविड रुग्णालय 5, महसूल कोविड केअर सेंटर 43, देगलूर कोविड रुग्णालय 9, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 252, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 67, खाजगी रुग्णालय 63 आहेत.  

रविवार 28 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 155, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 43 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 31 हजार 67
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 2 हजार 940
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 654
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 275
एकुण मृत्यू संख्या-598                            
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 94.17 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-22
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-567
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-17.