esakal | दुचाकी चोरांच्या उपद्रवामुळे नांदेडकर झाले त्रस्त, पोलिस प्रशासन मात्र सुस्त
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

नांदेड शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नांदेडकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. मात्र, पोलिस प्रशासन या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरत आहेत.

दुचाकी चोरांच्या उपद्रवामुळे नांदेडकर झाले त्रस्त, पोलिस प्रशासन मात्र सुस्त

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड :  शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक दिवसाला दोन ते तीन दुचाकी चोरीच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. 

घरासमोर, कार्यालयासमोर, सार्वजनिक ठिकाणी कुठेही दुचाकी सुरक्षित राहिलेल्या नाहीत. त्यातच कर्ज काढून, वर्षानुवर्षे देखभाल-दुरुस्ती करून आणलेली दुचाकी नजरेआड होताच गायब होत आहेत. त्यामुळे दुचाकीमालकांना दुचाकी घेतली तर काय गुन्हा झाला की काय? अशी भावना निर्माण झाली आहे. दुसरीकडे कारवाया करुनही दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे.

हेही वाचा - कोरोना समस्येचे निराकरण करण्याची घोषणा देण्याचा मान परभणीच्या वेणुगोपाल सोमाणींना 

नांदेड शहरासह जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे, खून, घरफोड्या, पिस्तुलांची तस्करी, विवाहितांचा छळ अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यात आता दुचाकी चोरांमुळे नांदेडकर चांगलेच हैराण झाले आहेत. घरासमोर किंवा खरेदीसाठी गेल्यानंतर बाजारात पार्क केलेली दुचाकी कधीही चोरीला जाईल याचा काहीच नेम राहिलेला नाही. त्यात एकदा दुचाकी चोरीला गेली की ती परत मिळण्याची प्रतीक्षा करण्यापलीकडे काहीच नाही. कारण पोलिस प्रशासनाला दुचाकी चोरटे खुले आव्हान देत दररोज एकतरी दुचाकी लंपास करत आहेत. 

हे देखील वाचाच - नांदेड : मतदानावर बहिष्कार टाकलेल्या निवघा ग्रामपंचायतीसाठी ३८ नामनिर्देशन अर्ज दाखल

सोमवारी (ता.चार जानेवारी २०२१) नांदेड तालुक्यामध्ये तीन दुचाकी चोरीचे गुन्हे लिंबगाव आणि विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. तळणी येथील मुंजाजी बाबाराव सूर्यवंशी यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच-२६, एव्ही-५८२४) तळणी शिवारातून चोरीला गेली आहे. त्यांच्या तक्रारीवरून लिंबगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून, श्री. दामोदर तपास करत आहेत.

येथे क्लिक कराच - परभणी : शिक्षण क्षेत्राला ऊर्जा देणार्‍या डॉ. सुचिता पाटेकर, आधूनिक सावित्रीची लेक

तसेच विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये दोन दुचाकी चोरीचे गुन्हा नोंदविण्या त आले आहेत. बेटसांगवी (ता.लोहा) येथील ऋषीकेश आनंदराव वानखेडे यांची ९० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर २२० कंपनीची दुचाकी (एमएच-२६, बीव्ही-६८५३) वानखेडे हाॅस्पीटलसमोरून चोरीला गेली आहे. शिवाय टाकळी (ता.नायगाव) येथील रघुनाथ लक्ष्मण पंदीलवाड यांची एमएच-२६, बीएस०८०२२ क्रमांकाची दुचाकी शंकरराव चव्हाण चौक कामठा येथून चोरीला गेली आहे.

loading image
go to top