esakal | लॉकडाउनच्या दिशेनी नांदेडकरांचा प्रवास; शनिवारी कोरोनाचा कहर ९४७ अहवाल पॉझिटिव्ह; सात बाधितांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

शनिवारी तीन हजार ८९६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये दोन हजार ७२३ निगेटिव्ह आले तर ९४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३० हजार ७८९ इतकी झाली आहे.

लॉकडाउनच्या दिशेनी नांदेडकरांचा प्रवास; शनिवारी कोरोनाचा कहर ९४७ अहवाल पॉझिटिव्ह; सात बाधितांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या नवीन वर्षात अच्यानक का वाढली? कोरोना डोके वर काढतोय हा प्रशासनाला पडलेला मोठा प्रश्‍नच आहे. अनेकदा सुचना करुन देखील नागरीक ऐकेनासे झाले आहेत. त्यामुळे हा कोरोनाचा रोज नवा उद्रेक होताना दिसत आहे. शनिवारी (ता.२०) प्राप्त झालेल्या अहवालात ३४० रुग्ण कोरोनामुक्त, सात बाधितांचा मृत्यू आणि ९४७ जणांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नांदेडकरांचा हा प्रवास म्हणजे लॉकडाउनच्या दिशेनी घेऊन जाणारा असाच असल्याचे बोलले जात आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधून त्यांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. १९) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शनिवारी तीन हजार ८९६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये दोन हजार ७२३ निगेटिव्ह आले तर ९४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३० हजार ७८९ इतकी झाली आहे. आतापर्यंत २५ हजार १५४ रुग्ण घरी परतले आहेत. 

हेही वाचा- नांदेड, परभणी, हिंगोलीसाठी आधुनिक सुविधायुक्त आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार - पालकमंत्री अशोक चव्हाण

एकूण रुग्णांची संख्या ६३९  

शनिवारी गाडीपुरा नांदेड पुरुष (वय ६५), गोणार ता. कंधार पुरुष (वय ६५), वजिराबाद नांदेड पुरुष (वय ५२), मालेगाव रोड नांदेड महिला (वय ७६), मगनपूरा नांदेड पुरुष (वय ७७), संचित नगर नांदेड महिला (वय ७५) यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय तर आझाद कॉलनी देगलूर महिला (वय ५५) या महिलेवर देगलूर कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान या सात बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६३९ इतकी झाली आहे. 

हेही वाचा- नांदेडकरांना समजावण्यासाठी सनदी अधिकारी उतरले रस्त्यावर

४७ बाधितांची प्रकृती गंभीर 

शनिवारी नांदेड महापालिका क्षेत्रात - ५७९, नांदेड ग्रामीण - ५८, अर्धापूर - २२, मुदखेड - एक, लोहा- ९१, देगलूर - नऊ, मुखेड -३२, किनवट- २३, हदगाव - १८, माहूर - २०, उमरी - १५, नायगाव - १७, कंधार -१०, भोकर -तीन, बिलोली - १५, धर्माबाद - ३२, परभणी - दोन, हिंगोली - एक, हिमायतनगर - आठ, औरंगाबाद - एक असे ९४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या चार हजार ७७० बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४७ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ३२७ स्वॅबची चाचणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर ः 

एकूण पॉझिटिव्ह - ३० हजार ७८९ 
एकूण बरे - २५ हजार १५४ 
एकूण मृत्यू - ६३९ 
शनिवारी पॉझिटिव्ह - ९४७ 
शनिवारी बरे - ३४० 
शनिवारी मृत्यू - सात 
उपचार सुरु - चार हजार ७७० 
गंभीर रुग्ण -४७ 
 

loading image