नांदेड : कामगारांच्या मोर्चाने शहर दणाणले

देशव्यापी संपास प्रतिसाद : शासकीय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
Nationwide trade unions strike msedcl Bank Employees Post office  LIC nanded
Nationwide trade unions strike msedcl Bank Employees Post office LIC nandedsakal

नांदेड : देशातील प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पहिल्या दिवशी नांदेड जिल्हा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्यावतीने कलामंदिरपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (ता.२८) मोर्चा नेण्यात आला. या मोर्चातील घोषणांनी नांदेड दुमदुमले. तर वीज मंडळ, बँक कर्मचारी, पोस्ट, एलआयसीमध्ये या संपाचा परिणाम दिसून आला. शासकीय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले तर वीज कर्मचारी व बँक कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर निदर्शने केली.

कामगार कर्मचारी विरोधी धोरणे रद्द करावीत, वाढत्या महागाईला आळा घालावा, यासह इतर मागण्यांसाठी देश पातळीवरील आयटक, सिटू, लाल निशाण आदी प्रमुख अकरा संघटनांनी ता. २८ आणि ता. २९ मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. आजच्या संपाच्या पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील कामगारांनी सहभाग नोंदविला. कामगार विरोधी जुने कामगार कायदे पुर्ववत लागू करावेत, चार लेबर कोड रद्द करावेत, खासगीकरणाचे धोरण रद्द करावे, एन.एम.पी. च्या नावाखाली सुरु असलेला राष्ट्रीय संपत्तीची विक्री थांबवावी, महागाईला आळा घालावा, पेट्रोलजन्य, घरगुती वापराचा गॅस करमुक्त करावे, बँकांचे खासगीकरण रद्द करावे, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, सर्व क्षेत्रातील कामगारांना सरसकट प्रतिमहा २८ हजार रुपये वेतन निश्चित करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य, सफाई, आशा, अर्धवेळ परिचारिका, ग्रामपंचायत कर्मचारी आदींना प्रोत्साहन भत्ता अदा करावा, आदी मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरु केला आहे.

कामगारांच्या निघालेल्या मोर्चात ना. रा. जाधव, अॅड. प्रदीप नागापूरकर, विजय गाभणे, बी. के. पांचाळ, के. के. जांबकर, सुर्यकांत वाणी, दिगंबर घायाळे, इरवंत सुर्यकर, उज्ज्वला पडलवार, अब्दुल गफार, शिवाजी फुलवळे, गंगाधर गायकवाड, गणेश संदुपटला, शिवाजी शेजुळे, श्री. गुरुपुठ्ठा, माधवराव जनकवाडे, केंद्रे मामा यांच्यासह सामाजिक वनीकरण, वन विभाग, आशा वर्कर्स, अंगणवाडी, अर्धवेळ परिचारीका, एमआर संघटना, विडी कामगार, कंत्राटी सफाई कामगार सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com