Nanded : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज नांदेडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Jayant Patil

Nanded : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज नांदेडला

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी (ता. २०) नांदेडमध्ये येणार असून विधानसभानिहाय पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. तसेच सदस्य नोंदणीचाही आढावा घेतील. माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्यासह पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मंगळवारी हिंगोली, नांदेड, लातूर या तीन जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. सकाळी साडेअकरा0 वाजता हिंगोली येथून नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी पावणेएक ते दीड या दरम्यान राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या निवासस्थानी ते भेट देतील. दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर व प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेणार आहेत.

सायंकाळी साडेतीन ते साडेचार या वेळेत नांदेड शहर जिल्हा कार्यकारिणीची शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक होईल. त्यानंतर साडेचार वाजता नांदेड येथून ते लातूरकडे प्रयाण करणार आहेत. या बैठकीमध्ये पक्ष संघटनेचा विधानसभानिहाय आढावा घेण्यात येणार आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियान राबवत आहे. या अभियानाचा प्रदेशाध्यक्ष पाटील आढावा घेणार आहेत. आयोजित केलेल्या बैठकीला विधानसभा मतदारसंघाचे आजी-माजी आमदार, प्रदेश प्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, पक्ष निरीक्षक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षासह सर्व फ्रंटल व सेलचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. सुनील कदम, हरिहरराव भोसीकर यांनी केले आहे.

Web Title: Ncp State President Jayant Patil Visit Nanded Today Membership Registration

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..