सात महिन्यापासून एनसीपीचे जिल्हाध्यक्षपद रिक्त, कुठे ते वाचा? 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 27 August 2020

महाआघाडीच्या प्रयोगात सत्ता लाभली असली तरी नांदेड जिल्ह्यात या पक्षाची प्रचंड वाताहात होतांना दिसुन येत आहे. माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी पक्ष सोडल्यानंतर ग्रामिणची जबाबदारी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्याकडे आली आहे. 

नांदेड : सार्वत्रीक विधानसभा निवडणूका पार पडून सात महिणे उजाडले. तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद अजूनही रिक्त आहे. त्यामुळे पक्ष वाढीसाठी किंवा मजबुत करण्याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामिण भागातील राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सैरभर झाले आहेत. महाआघाडीच्या प्रयोगात सत्ता लाभली असली तरी नांदेड जिल्ह्यात या पक्षाची प्रचंड वाताहात होतांना दिसुन येत आहे. माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी पक्ष सोडल्यानंतर ग्रामिणची जबाबदारी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्याकडे आली आहे. 

विधानसभा निवडणूका संपून सात महिणे उलटले तरी पक्षाला ग्रामीण जिल्हाध्यक्ष नियुक्त करता आला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात या पक्षाच्या कार्यकर्त्यांत प्रचंड मरगळ आली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत संघटन होते आता येथे बऱ्यापैकी असले तरी जनमानसांशी थेट संपर्कात असलेल्या अनेक पुढाऱ्यांनी हा पक्ष सोडला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक स्तरावर नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी पक्ष सोडल्यानंतर या पक्षाला निवडणूक कालावधीत उतरती कळा लागली. दुसरीकडे निवडणुकीनंतर एक नंबरचा भाजप हा पक्ष विरोधी बाकावर जाऊन बसला आणि शिवसेना काँग्रेससोबत महा आघाडीचा प्रयोग करून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याची सत्ता हाती घेतली.

हेही वाचा -  स्वारातीम विद्यापीठात साकारतोय अत्याधुनिक मीडिया स्टुडिओ -

सात महिने झाले तरी नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली गेली नाही

राष्ट्रवादीला सत्तेत वाटा मिळाल्याने पुन्हा उभारी घेऊ लागला. शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्यावर या पदाचा अतिरिक्त भार टाकण्यात आला. तेंव्हापासून ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद रिक्तच आहे. राज्यस्तरावर सत्तेचा प्रमुख भागीदार म्हणून या पक्षाचे नेते भूमिका बजावत असताना दिसत असले तरी त्यांनी नांदेडकडे मात्र फारसे लक्ष दिलेले नाही. सात महिने झाले तरी नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली गेली नाही. जिल्ह्यात बऱ्यापैकी कार्यकर्त्यांचे बळ असतानाही नवीन जिल्हाध्यक्ष निवडीचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात या पक्षाला मरगळ आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP's district president post has been vacant for seven months, where to read it nanded news