चोरट्यांची नवी शक्कल : नांदेडमध्ये सीसीटीव्ही फोडून महावितरणच्या कंत्राटदाराचे फोडले घर 

प्रल्हाद कांबळे
Monday, 30 November 2020

महावितरणचे कंत्राटदार खंडेराव हसनाळकर यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला

नांदेड : शहराच्या विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नालंदानगर येथे घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी ता. २७ नोव्हेंबरच्या रात्री झाली. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महावितरणचे कंत्राटदार खंडेराव हसनाळकर यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही तोडून नुकसान केले. खंडेराव होळकर हे आपल्या घराला कुलूप लावून कुटुंबासह त्यांच्या मूळ गावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ता. २७ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे आणि फुटेज व डीसीआर तोडून नुकसान केली.

हेही वाचा -  नांदेड : कोणत्याही विषाणूसाठी थंडी असते पोषकच, खबरदारीची गरज

चोरट्यांनी कपाटात ठेवलेले नगदी दोन लाख रुपये व काउंटरमधील २५ हजार रुपये असा दोन लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. खंडेराव हसनाळकर हे आपल्या गावावरुन परत आल्यानंतर आपल्याकडे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विमानतळ पोलिसांना घरफोडी झाल्याचे कळविले. यावेळी पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. पोलिसांचे श्वानपथक आणि ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांनी कुठलाच माग ठेवला नसल्याने या पथकाला खाली हात परतावे लागले. यानंतर खंडेराव हसनाळकर यांच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A new face of thieves: CCTV broke into MSEDCL contractor's house in Nanded