साडे चौदा कोटी प्रकरणी ‘आयडीबीआय’ बॅंकेला तीन दिवसांची मुदत - ओमप्रकाश पोकर्णा

शिवचरण वावळे
Friday, 8 January 2021

शंकर नागरी बँकेनी जेव्हा ‘आयडीबीआय’कडे साडेचौदा कोटी रुपये ठेवले होते तेव्हा बँकेकडे ओटीपीची क्रमांक द्यावा, अशी मागणी केली होती. पण त्यांच्याकडून ‘ओटीपी’ मिळाला नाही. झालेल्या व्यवहार आमच्याकडून कुठलेही निर्देश नसताना आमच्या बँक खात्यातून २८९ खात्यावर ही रक्कम वळती झाली आहे. दरम्यान, बँकेनी आमच्याकडे फंड मागितला तेव्हा हा गोंधळ शंकर नागरी बँकेच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघड झाला आहे. 

नांदेड - शंकर नागरी सहकारी बँक ही अनेक वर्षापासूनची लोकांच्या विश्‍वासास पात्र ठरलेली बँक आहे. इतर सहकारी बँकेप्रमाणेच शंकर नागरी सहकारी बँक देखील आयडीबीआय बँकेची ग्राहक आहे. बॅकेने साडेचौदा कोटी रुपये अनामत रक्कम ‘आयडीबीआय’कडे ठेवली होती. मात्र, बँकेने आम्हाला कुठलीही पूर्व कल्पना न देता खात्यातून साडेचौदा कोटी रुपये वळते झाले. ती रक्कम तीन दिवसात आमच्या खात्यात वळती झाली नाही तर ‘आयडीबीआय’ बँकेवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती शंकर नागरी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी गुरूवारी (ता. सात) पत्रकार परिषदेत दिली. 

माजी आमदार श्री. पोकर्णा म्हणाले की, शंकर नागरी बँकेनी जेव्हा ‘आयडीबीआय’कडे साडेचौदा कोटी रुपये ठेवले होते तेव्हा बँकेकडे ओटीपीची क्रमांक द्यावा, अशी मागणी केली होती. पण त्यांच्याकडून ‘ओटीपी’ मिळाला नाही. झालेल्या व्यवहार आमच्याकडून कुठलेही निर्देश नसताना आमच्या बँक खात्यातून २८९ खात्यावर ही रक्कम वळती झाली आहे. दरम्यान, बँकेनी आमच्याकडे फंड मागितला तेव्हा हा गोंधळ शंकर नागरी बँकेच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघड झाला आहे. 

हेही वाचा- नांदेडला दिवसभरात २६ रुग्ण कोरोनामुक्त; ३५ अहवाल पॉझिटिव्ह

ग्राहकांच्या ठेवींना कुठलाही धोका नाही.

दोन वर्षांपूर्वी ओझर, देवडा व धुळे विकास धुळे आणि नगर अशा बॅंकेत असे प्रकार ‘आयडीबीआय’च्या इतर शाखेत घडले आहेत. ही आमची बदनामी नसून ‘आयडीबीआय’ची बदनामी असल्याचेही त्यांनी सांगितले. शंकर नागरी ही ‘आयडीबीआय’ बॅंकेची ग्राहक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बँकेनी साडे चौदा कोटी रुपये ठेवले होते. ग्राहकांच्या ठेवींना कुठलाही धोका नाही. बॅंकेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. तीनशे कोटींचा व्यवहार आहे. दीडशे कोटी नगदी व्यवहार करण्याची क्षमता आहे. 

हेही वाचा - नांदेड : पत्नी व मुलाच्या मृत्यूप्रकरणी पतिसह चार जणांना पोलिस कोठडी ​

सरकारने अशा घटनेची तरतुद करावी

ऑनलाइन प्रणाली धोक्याची असल्याने सरकारने अशा प्रकारच्या घटनेची भरपाई देण्याची तरतुद करावी. आम्हाला आमचे पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. आम्हाला बॅंकेशी कुठलेही वैर नाही, असे देखील श्री. पोकर्णा यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस सत्यनारायण लोहिया, एकनाथ मामडे, बॅंकेचे सरव्यवस्थापक विक्रम राजे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 

बँकेनी आमचे पैसे परत करावेत
आमचे आयडीबीआय बँकेशी कुठलेही वैर नाही. आम्हाला उसिराने का होईनात आमचे साडे चौदा कोटी रुपये आयडीबीआय बँकेनी परत करावेत अशी आमची प्रामाणिक अपेक्षा आहे.
ओमप्रकाश पोकर्णा, अध्यक्ष शंकर नागरी सहकारी बँक, नांदेड.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Omprakash Pokarna give three days ultimate to IDBI Bank Nanded News