भूकबळीला कंटाळून एकाची आत्महत्या

20200309111337.jpg
20200309111337.jpg

हदगाव, (जि. नांदेड) ः लॉकडाउन सतत वाढत गेल्यामुळे एकाकी पडलेल्या व्यक्तीने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून बुधवारी (ता. १३) मध्यरात्री आत्महत्या केल्याची घटना आझाद चौक येथील वडार गल्लीत (ता. हदगाव) येथे घडली आहे. मयत राजू मारुती बाभूळकर (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

कोरोनामुळे गरीबी वाढली असून अनेकांना घरी खाण्यासाठी अन्न नाही. कोणाला शेती नाही, तसेच मजुरांसाठी शासनाकडून लाॅकडाऊनमध्ये कुठलीही मदत मिळाली नाही. या मुळे अनेक मजुर मजुरी करुन गुजराण करणारी कुटुंब अडचणीत आली आहेत. अशा मजुर कुटुंबासाठी शासनाने लाॅकडाऊन काळात रोजगार हमीची कामे सुरू केली असती व आर्थीक मदत केली असती तर अशा भूकबळीपासून वाचवता येईल.

लोकांकडून नियमित मदत होत नव्हती
हा व्यक्ती वडार समाजातील असून तो दगड फोडण्याचे काम करीत होता. सतत लॉकडाउन वाढत असल्याने हाताला मिळणारा रोजगार संपून गेला. काम असेल तर घर आणि पोटाची उपजीविका भागू शकते. परंतु, कामच नसल्यामुळे मुलीवर उपासमारीची वेळ आली होती. सगळी परिस्थिती पाहून परिसरात राहणाऱ्या त्यांच्या ओळखीच्यांकडून त्याला व त्याच्या मुलीला जेवण दिले जात होते. मात्र, लॉकडाउन वाढतच गेल्यामुळे लोकांकडून नियमित मदत होत नव्हती.

चिंतेत तो एकांतात बसत असायचा
रोजच्या जेवणाचा होत असलेल्या त्रासामुळे तो एकाकी पडला होता. मयत राजू यांची दोन मुले व पत्नी कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. परंतु, लॉकडाउनमुळे त्यांच्या सुद्धा हाताला काम नव्हते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच पायी चालत हदगाव येथे आले. प्रशासनाने त्यांना समाज कल्याण हॉस्टेल हदगाव येथे क्वारंटाइन केले. मयत राजू बाभूळकर सतत निराश राहात होता व आता पत्नी व मुले सुद्धा आल्याने सगळ्यांना जगावायचे कसे, या चिंतेत तो एकांतात बसत असायचा.


आता तर आपली पत्नी व दोन मुले सुद्धा येथे आली असल्याचे त्यांना समजले. आता आपण त्यास काय खाऊ घालणार? यापुढे लॉकडाउन किती वाढेल त्याचीही खात्री नाही. यामुळे या नैराश्यातून त्यांनी आपली जीवनयात्रा (ता. १३) रोजी मध्यरात्री संपविली. या प्रकरणी हदगाव पोलिस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com