esakal | बेरोजगारांसाठी संधी : पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगारांचा नांदेडमध्ये ऑनलाईन मेळावा
sakal

बोलून बातमी शोधा

deen dayal upadhyaya

बेरोजगारांसाठी संधी : पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगारांचा नांदेडमध्ये ऑनलाईन मेळावा

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाच्या वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता जिल्हयातील बेरोजगार (corona virus) उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ता. 17 ते 21 मे 2021 या कालावधीत पाच दिवसाचे “पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या”चे ऑनलाईन आयोजन करण्यात (online program) आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास इमारत, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड आणि इप्मॉवर प्रगती वोकेशनल ॲन्ड स्टाफिंग प्रा. ली. (पीएमकेके) नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. (Opportunity for the Unemployed: Pandit Deendayal Upadhyay Employment Online Meet in Nanded)

नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावेत. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप ईव्दारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर सपंर्क साधवा.

हेही वाचा - मोकाट फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी; जिंतूर पोलिस व नगरपालिकेची कारवाई

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना जॉब सिकर ऑप्शनमध्ये नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल ऑनलाईन जॉब Fair 1 मेळावा असे दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील व क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून I Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव, शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल, असेही आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.