माहूरच्या मातृतीर्थचा विकास झाल्यास पर्यटनाला संधी

file photo
file photo

नांदेड : माहूर रेणूका माता गड परिसरात असलेल्या मातृतीर्थ परिसाराच्या विकासासाठी देवी संस्थआन किंवा नगरपंचायतकडे  हस्तांतरण करण्याची मागणी करण्यात येत आहे. पुरातन व प्राचीन इतिहास असलेले मातृतीर्थ हा परिसर विकासापासून दूर असल्याने पर्यटनाचा दर्जा मिळत नाही. नगरपंचायत किंवा देवी संस्थआनकडे वर्ग केल्यास याचा विकास होईल असे सांगण्यात येत आहे. 

लोकसहभागातून व विविध संस्थेच्या माध्यमातून गतवर्षी गाळ मुक्त झालेले मातृतीर्थ तलाव परिसर विकासासाठी श्री रेणुका देवी संस्थान किंवा नगरपंचायत इकडे हस्तांतरण करा अशी मागणी होत आहे. माहूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले मातृतिर्थ हे राज्य सरकारचे संरक्षित स्मारक आहे. माहूर गडाच्या पायथ्याशी असणारे एक तीर्थ आहे. या तीर्थात स्नान केल्याने सर्व पापे नाहीशी होतात असा समज आहे. अनेक भक्त या तीर्थावर आपल्या मृत्त आईचे श्राद्ध करतात. त्याने आत्म्यास मुक्ती मिळते असे म्हणतात. याबाबतची कथा रेणुका महात्मे या ग्रंथात आहे. तसेच गुरुचरित्र या ग्रंथात देखील याचे वर्णन आहे.

माहुरगड हे चिखलदरा, महाबळेश्वरच्या तुलनेत कमी नाही

परशुरामाने या तीर्थाची निर्मिती केली अशी अख्यायिका आहे. धार्मिक महात्मे असणारे हे तीर्थ सध्या चांगलेच प्रकाशझोतात आले आहे. पावसाळा सुरू होतात निसर्गाच्या सानिध्यात असलेले मातृतीर्थ कुंड परिसरातील निसर्गरम्य वातावरण अनेकांना आकर्षित करत आहे. शांत, निवांत आणि ग्रामीण जीवन जवळून न्याहाळण्याची आवड असलेल्यांसाठी माहुरगड हे चिखलदरा, महाबळेश्वरच्या तुलनेत कमी नाही. शासनाच्या दुर्लक्षामुळे माहूर पर्यटन विकास रखडला आहे. तरी माहूरला निसर्गाने खूप काही दिले आहे. त्या ठिकाणी काहीच नाही अशी ठिकाणे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होऊन        नावारूपाला येत आहेत. मात्र माहूर पर्यटनाच्या दृष्टीने योग्य आणि सर्व सोयी सुविधा असलेले स्थळ आजही उपेक्षित आहे.

पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाउंडेशनने पुढाकार 

यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असल्या तरी सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय नेत्यांची उदासीनता पहावयास मिळते. माहूरच्या या मातृतीर्थ कुंडातील गाळ काढण्यासाठी पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाउंडेशनने पुढाकार घेतला होता. मातृतीर्थ तलाव, ऋणमोचन कुंड व दत्तमांजरी जवळील काळापाणी तलाव गाळमुक्त केले होते. यात आता लाखों लिटर पाणी साठवण क्षमता आहे. सर्वोदय फाउंडेशनच्या कामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलशक्ती मंत्रालयाने दखल घेतली. व या बाबतीत चित्रफिती प्रसारित केली होती.

मातृतीर्थ परिसर विकासासाठी २५ कोटी रुपये द्यावेत 


या कुंडातील गाळ काढण्याच्या मोहिमेस माहूरमधील पर्यावरण प्रेमीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकसहभागातून झालेल्या कामाला तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच श्री रेणुका देवी संस्थानेही यात सहभाग घेतला होता. काही महिन्यातच सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून माहूर गडाच्या पायथ्याशी असलेल्या तलावाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. या परिसराचा विकास करण्यासाठी हा परिसर श्री रेणुका देवी संस्थान किंवा नगर पंचायतीकडे हस्तांतरित करावा तसेच नाना- नानी पार्कचे स्वप्नही पूर्ण होईल त्यासाठी शासनाने मातृतीर्थ परिसर विकासासाठी २५ कोटी रुपये द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदू संतान केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com