esakal | कोरोना इफेक्ट : शाळा सुरु करण्याबाबत शाळांची नकार घंटा
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

शासनाने जुलै महिन्यापासून माध्यमिक वर्ग सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यादृष्टीने पावलेही उचलली जात असून, शिक्षण संस्था मात्र शाळा सुरु करण्याच्या मनःस्थितीमध्ये दिसत नाही. पालकांमधूनही नकाराचीच घंटा आहे.

कोरोना इफेक्ट : शाळा सुरु करण्याबाबत शाळांची नकार घंटा

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढतच आहे. नववी ते बारावीच्या नियमित शाळा सुरु करण्याबाबत शाळा समिती व पालकांची भूमिका जाणून घेण्यात येत आहे. त्यामध्ये बहुतांश शाळांनी नकार घंटा दिली आहे. शिक्षण संस्थांबरोबरच पालकांमधूनही नाराजी दर्शविण्यात येत असल्याने नववी ते बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरु करण्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.

नवीन शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरु करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाच्या सुरु आहेत. परंतु, प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याबाबत शैक्षणिक संस्था आणि पालक यांच्या पातळीवर हा निर्णय होईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्था, शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांची सभा घेऊन शाळा सुरु करण्याबाबतची माहिती शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली आहे. मात्र, नववी ते बारावीच्या बहुतांश शाळा सुरु करण्याबाबत नकार दर्शविला आहे.

हेही वाचा - Corona Breaking : नांदेडात दोघांचा मृत्यू, ११ पॉझिटिव्ह

शाळा सुरु करण्याबाबत संस्थाचालक, पालक तसेच काही शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेतली असता, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी नियमित शाळा सुरू करण्यावर नाराजीच व्यक्त केलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही अडचणीत सापडला आहे. जुलै महिन्यापासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेची उत्सुकता लागली होती. शासनाकडून सुद्धा शाळा सुरु करण्याबाबत लेखी स्वरुपात कुठलेच आदेश मिळालेले नाहीत. मात्र, आता शिक्षण संस्थांनी आडकाठी घातल्याने जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरु होण्याबाबत स्पष्टता दिसून येत नाही.

येथे क्लिक कराच - राज्यात प्रथमच : नांदेडात आता ‘मिशन पॉझिटिव्ह सोच’

वाहतुकीचा प्रश्न
बहुतांश खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे स्वतःच्या बसेस आहेत. परंतु, फिजिकल डिस्टन्सिंगमुळे वाहतुक परवडणारी नाही. तसेच काही शिक्षण संस्थांकडे स्वतःच्या स्कूल बसेसही नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात विद्यार्थी आणण्यासाठी वाहतुकीचाही प्रश्न शिक्षण संस्थांसह पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थी संख्या कमी असल्याने स्पेशल बसही त्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केल्या जाऊ शकत नाही.

हे देखील वाचाच - माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू 

काय आहे पालकांची भूमिका
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे प्रत्येकजण काळजीमध्ये असून, स्वतःसोबतच कुटुंबाची सुरक्षा कशी करावी? या विवंचनेमध्ये मध्ये. असे असले तरी, प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ग्वाही घेणार असेल तर पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. मात्र, विद्यार्थी एकत्र आल्यास धोका वाढू शकतो.

loading image
go to top