esakal | श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानात सर्वधर्मियांचा सहभाग
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे सहकार्यवाहक विलासअण्णा दहिभाते यांची माहिती

श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानात सर्वधर्मियांचा सहभाग

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात चैतण्यमय वातावरण निर्माण झाले असून हिंदूसोबत मुस्लिम, शिख, बौद्ध, ख्रिश्‍चन आदीं सर्वधिर्मियांनी यात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. दोन कोटी ४० लाखांवर समर्पण निधी जिल्ह्यातर्फे श्री राम मंदिर निर्माण ट्रस्टच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे सहकार्यवाहक विलास दहिभाते यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.

यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, उपाध्यक्ष सु. ग. चव्हाण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासंघ चालक सुधीर कोकरे, विहिंपचे जिल्हाध्यक्ष नवीनभाई ठक्कर, अभियान प्रमुख शशिकांत पाटील आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना दहिभाते म्हणाले, नांदेड जिल्ह्यामध्ये रामसेवा अधिक प्रभावी व्हावी म्हणून जिल्ह्याचे नांदेड व किनवट असे दोन भाग करण्यात आले. ता. 15 जानेवारी ते ता. 15 फेब्रुवारी दरम्यान, निधी संकलन करण्यात आले. नांदेड भागात बारा तालुक्यांचा समावेश करण्यात आला व प्रत्येक तालुक्यात दहा गावाचे एक मंडल आणि शहर स्थानावर दहा हजार लोकसंख्येची एक वस्ती अशी भौगोलिक रचना लावून रामसेवकांनी अभियान मोठ्या उत्साहाने राबविले. 

नांदेड जिल्ह्यातील 884 पैकी 884 गावापर्यंत व शहरी भागातील 117 पैकी 117 वस्त्यामध्ये अभियान पोहोचले. यामध्ये एकूण 18 हजार 550 राम भक्तांनी दोन लाख 80 हजार 902 कुटुंबापर्यंत संपर्क केला. या अभियानामध्ये दोन कोटी 40 लाखांच्या वर समर्पण निधी जिल्ह्यातर्फे श्री राम मंदिर निर्माण ट्रस्टच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामीण भागात व शहरात विविध ठिकाणी शंभराच्यावर शोभायात्रा काढण्यात आल्या. याअभियानातून दातृत्व परिस्थितीशी नसून मनस्थितीशी आहे, समजून आले. बरेच अनुभव प्रेरणादायी आहेत. दारिद्रय, निरक्षरता यासह अनेक समस्या पहायला मिळाल्या. त्यामुळे अभियानापुरते फिरलो असे न होता यापुढेही सक्रीय राहणार असून सज्जन शक्ती संघटीत करुन नित्यशक्तीत त्याचे रुपांतर करणार असल्याचेही दहिभाते यांनी सांगितले. दरम्यान, समितीचे अध्यक्ष डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी राष्ट्र मंदिर निर्माणासाठी आम्ही फिरलो ही रामाची कृपा असून अशा कार्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगून ही समिती बरखास्त करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
 

loading image
go to top