जिल्ह्यात रविवारी दुकाने-आस्थापना चालू ठेवण्यास मुभा- डाॅ. विपीन

प्रल्हाद कांबळे
Sunday, 27 September 2020

आदेशातील नियमावलीसह 30 सप्टेंबर 2020 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधिन राहून आस्थापना व दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती.

नांदेड : नांदेड जिल्ह्यात ताळेबंदी (लॉकडाउन) मधून प्रत्येक रविवारी दुकाने- आस्थापना चालू ठेवण्याची मुभा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.

आदेशातील नियमावलीसह 30 सप्टेंबर 2020 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधिन राहून आस्थापना व दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. परंतू जिल्ह्यात दुकाने आस्थापना रविवारी बंद असल्याने दर शनिवारी व सोमवारी गर्दी होत होती. त्यामुळे इतर अनुषंगिक व्यवहार सुरळीत राहण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून ही गर्दी कमी होण्यासाठी प्रत्येक रविवारी दुकाने आस्थापना चालू ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये संपुर्ण नांदेड जिल्हयात यापुढे प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत सर्व दुकाने / आस्थापना चालू ठेवण्याची ताळेबंदी (लॉकडाऊन)  मधुन मुभा दिली आहे.

ता. 23 सप्टेंबर 2020 रोजी निर्गमित केले होते

या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 23 सप्टेंबर 2020 रोजी निर्गमित केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission to continue shops and establishments in the district on Sundays Dr. Vipin nanded new