जिल्ह्यात एक हजार शेतीशाळांचे नियोजन

खरिपासाठी कृषी विभागाचा पुढाकार; पोखरा, आत्मा, क्रॉपसॅप, राअसुचे अभियान
शेतीशाळा
शेतीशाळाSakal

नांदेड - नांदेड जिल्ह्यात येत्या खरिप हंगामामध्ये एक हजार ५६ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), क्रॉपसॅप, राअसु (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान) (कडधान्य, गळीतधान्य, पोष्टीक तृणधान्य) या योजनेचा समावेश आहे. त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.

खरिपातील पिकांबाबत विविध टप्यावर शेतकऱ्यांना सोयाबीन, खरिप ज्वारी, कापूस, तूर आदी पिकांविषयी माहिती मिळावी, यासाठी प्रत्यक्ष शेतावर शेतीशाळांचे आयोजन केले जाते. यंदाही जिल्ह्यात एक हजार ५६ शेतीशाळांचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चवलदे यांनी दिली आहे. यामध्ये ३१८ महिलांच्या शेतीशाळा होणार आहेत.

या शेतीशाळांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोखरा) अंतर्गत ६२१, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत १३०, क्रॉपसॅप अंतर्गत २१०, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत ५४ (कडधान्य, गळीतधान्य, पोष्टीक तृणधान्य) शेतीशाळा होणार आहेत. या शेतीशाळा जिल्ह्यातील १६ तालुक्यात सध्या कार्यरत असलेल्या ३२३ कृषी सहायक व ५३ कृषी पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत होणार आहेत. शेतकर्‍यांनी या शेतीशाळेत सहभागी होवून खरिपातील पिकांचे दर्जेदार उत्पादन घ्यावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतीशाळांची उदिष्ट्ये

निरोगी व सशक्त पिक जोपासण्यासाठी शेतकरी यांना मार्गदर्शन करणे, किडीच्या नैसर्गिक शत्रूंचे अर्थात आपल्या मित्र किटकांचे संवर्धन करण, नियमितपणे निरीक्षणे घेणे, निरिक्षणावर आधारित निर्णय घेणे आणि शेतकऱ्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेणे, शेतकऱ्यांना एकात्मिक पिक व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन यामध्ये तज्ज्ञ बनविणे, शेतकरी समूह एकत्र येणे व त्यांच्या गरजांवर आधारित कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम राबवणे हे शेतीशाळांचे उदिष्ट्ये असल्याची माहिती देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com