esakal | कारगिल विजय दिनानिमित्त नांदेड येथे वृक्षारोपण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हा विजयी दिन साजरा करण्याचा निर्णय घेऊन देशासाठी सध्याची गरज काय आहे हे पाहता हरित नांदेड हा संकल्प घेऊन वृक्षारोपण केले. नांदेडमध्ये महानगरपालिकेच्या सहाय्याने शिवाजीनगर येथील नाना-नानी पार्कमध्ये वृक्ष मित्र परिवार, वीर सैनिक ग्रुप व निफा या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदान करून वृक्षारोपण करण्यात आले. 

कारगिल विजय दिनानिमित्त नांदेड येथे वृक्षारोपण

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : रविवारी (ता. २६) जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहतो. व झालेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करतो. यात्र काही मंडळी या विजयी दिनी नविन उपक्मर राबवितात. हा विजयी दिन साजरा करण्याचा निर्णय घेऊन देशासाठी सध्याची गरज काय आहे हे पाहता हरित नांदेड हा संकल्प घेऊन वृक्षारोपण केले. नांदेडमध्ये महानगरपालिकेच्या सहाय्याने शिवाजीनगर येथील नाना-नानी पार्कमध्ये वृक्ष मित्र परिवार, वीर सैनिक ग्रुप व निफा या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदान करून वृक्षारोपण करण्यात आले. 

वीर सैनिक ग्रुपचे सदस्य सैनिक प्रविण देवडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 'एक हात मदतीचा व एक हात सुरक्षेचा' या संकल्पनेने नांदेड मध्ये येणाऱ्या काळात अनेक वृक्षारोपण करुन हरित नांदेडचा संकल्प त्यांनी घेतला व आशा सामाजिक व लोकहीत उपयोगी कार्यात नेहमी सहकार्य करू व नांदेड    येथील शहीद सैनिकांच्या परिवारास कसलीही अडचण असेल अथवा मदतीची गरज असेल तर वीर सैनिक ग्रुप मदतीसाठी सदैव तत्पर राहील ही घोषणा करण्यात आली. 

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यात या शहरातील फेरीवाले होणार आत्मनिर्भर...वाचा सविस्तर

वृक्षमित्र आनंदवन घनवन संकल्पनेची माहिती युवकांना दिली

युवकांची साथ या अशा योजनेला मिळत राहावं अशी अपेक्षा महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक डॉ. फराहद बैग यांनी केली. निफाचे प्रेरणास्थान हर्षद शहा यांनी युवकांच्या सहायाने अशा योजना पूर्ण केल्यास त्याला मोठे रूप मिळेल व चांगलं कार्य करण्याची प्रेरणा आणखीन लोकांपर्यंत पोहोचेल असे वक्तव्य यावेळेस त्यांनी व्यक्त केले. यासोबतच प्रीतम भराडिया यांनी वृक्षमित्र आनंदवन घनवन संकल्पनेची माहिती युवकांना दिली व त्याच्यामुळे होणारे फायदे देखील सांगून पुढील आणखीन या कार्यास आणखीन मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 

निफाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भरत जेठवाणी यांचा उपक्रम

तसेच निफाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भरत जेठवाणी यांनी व त्यांच्या सहकार्यांनी असे कार्यक्रम व हा उपक्रम वर्षभर राबवण्याचे संकल्प घेतले तर वृक्षारोपण करून त्याला संगोपन करण्याची देखील गरज आहे असे मत यावेळेस त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी निफाचे  राज्य कार्यकारी सदस्य राजीव जैन, जिल्हाध्यक्ष भास्कर डोईबळे, सचिन जोड, अतुल दोंगावकर, प्रल्हादजी घोरबांड व वीर सैनिक ग्रुपचे  सैनिक सुमित मोरे,अर्जुन नागेश्वर, जयेश भरणे , संतोष कापसे बलबीर सिंघ, स्वप्नील मेरगु, विनय मंतुरी, सुमित ठाकूर, सोनू ढगे, कृष्णा स्वामी, प्रसाद तेलंग, नरसिंग मुरकुटे, रितीक नार्डीले, गणेश कौटूलवार, प्रथमेश जोशी, व सर्व वीर सैनिक ग्रुप आणि विविध संस्थेचे सदस्य एवं वृक्ष मित्र या वेळेस उपस्थित होते.
 

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image