नांदेडमध्ये पोलिसांनी तीन दुचाकी चोरांना पकडले 

file photo
file photo

नांदेड - शहरातील वजिराबाद ठाण्याच्या गुन्हे शोध (डीबी) पथकाने तीन दुचाकी चोरांना गुरुवारी (ता. पाच नोव्हेंबर) पकडले असून त्यांच्या ताब्यातील दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. यातील एक दुचाकी तामसा (ता. हदगाव) पोलिस ठाण्याच्या तर दुसरी दुचाकी वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली होती. 

गेल्या दोन महिन्यापासून नांदेड शहर आणि जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. दररोज चार - पाच दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. त्याचबरोबर चार चाकी वाहने तसेच ट्रक, ॲपेरिक्षाही चोरीला गेल्या होत्या. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत होता पण आरोपी काही सापडत नव्हते. त्याचबरोबर पोलिस विभागाचेही त्याकडे फारसे लक्ष नव्हते. त्यामुळे चोरीला गेलेल्या वाहनांचेही मालकही वैतागले होते. तसेच तक्रारीही वाढल्या होत्या. 

पोलिस अधीक्षकांनी केल्या सूचना
दुचाकी आणि इतर वाहनांच्या चोरीबाबत पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, भोकरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी सर्व पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार यांची बैठक घेऊन त्यांना दुचाकी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

पोलिसांनी सुरु केली तपासणी 
शहरातील वजिराबाद पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे (डीबी) सुनिल पुंगळे, फौजदार अब्दुल रब, पोलिस जमादार दत्तराम जाधव, पोलिस नाईक गजाजन किडे, संजय जाधव, संतोष बेलुरोड, चंद्रकांत बिरादार, शरदचंद्र वावरे, जसप्रितसिंघ शाहू, नितीन भुताळे यांनी दुचाकी चोरांचा शोध घेण्यास सुरूवात केली.    

तीन चोरटे सापडले

नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून दोन व्यक्ती विनाक्रमांकाची दुचाकी घेऊन चालले होते. त्यांना हटकले असता मालकी हक्काबाबत त्यांनी काहीच समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे दुचाकीची माहिती घेतली असता ती सुदर्शन टेकाळे (रा. उमरखेड) यांच्या मालकीची असल्याचे कळाले. या दोघांनी तामसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे आढळून आले. त्यावरून या दोघांना दुचाकीसह तामसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुसऱ्या घटनेत नांदेड बसस्थानकाजवळ एका संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली दुचाकी ही चोरीची असल्याची शक्यता वाटल्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती घेतली. त्याच्याकडील दुचाकी वजिराबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तपासणीक अंमलदार पोलिस जमादार शंकर ढगे यांनी त्यास अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com