नवीन रेल्वेमार्गासाठी चिखलीकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

खासदार प्रताप पाटील चिखलीकर
खासदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड : तेलंगणा (Telangana) आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या विकासात भर पडण्यासाठी आणि दळणवळणाची नवी साधने उभारण्यासाठी बोधन-मुखेड-लातूर रोड व किनवट - माहुर - पुसद या नव्या रेल्वेमार्गाची निर्मिती करावी, अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर (MP Pratap Patil Chikhlikar) यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे ( Union Minister Of State For Railway Raosaheb Danve) यांच्याकडे केली आहे. श्री.चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, किनवट - माहूर - पुसद असा नवीन रेल्वेमार्ग निर्माण करावा. नांदेड - हदगाव - पुसद - यवतमाळ - वर्धा या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. त्या कामाला लवकर सुरुवात करावी. शिवाय किनवट - माहूर - पुसद असा नवीन मार्ग मंजूर झाल्यास आदिवासी भागाचा विकास होऊ शकतो. माहूर तीर्थक्षेत्राच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी भाविकांना सोयीचे होणार आहे. (pratap patil chikhalikar met union minister of state for railway raosaheb danve glp 88)

खासदार प्रताप पाटील चिखलीकर
स्वातंत्र्यानंतरही मरण यातना संपेना! अहो माणुसकी गेली कुठे?

तसेच या भागातील व्यापार वाढण्यासही मदत होईल. त्याच बरोबर रेल्वे क्रमांक १२७२८ आणि १२७३० नांदेड - पुणे एक्सप्रेस (Nanded-Pune Express) दररोज सुरू करावी. कारण नांदेड येथून दररोज पुणे येथे जाण्यासाठी खासगी वाहनांना गर्दी असते. सध्या या मार्गावर एकच रेल्वे धावत असून ती पुरेशी नाही. त्यामुळे नांदेड - पुणे - नांदेड व्हाया औरंगाबाद - मनमाड ही एक्सप्रेस दररोज सुरू करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर रेल्वे संख्या १२७९३ आणि १२७९४ रॉयल सीमा एक्स्प्रेस निजामबाद ऐवजी नांदेडहून (Nanded) सोडावी. असे झाल्यास नांदेड जिल्ह्यातील भाविकांना तिरुपती येथे (Railway In Marathwada) जाण्यासाठी सोयीचे होणार आहे. नांदेडचा गुरुद्वारा, तिरुपती बालाजी हे जगप्रसिद्ध स्थळे रेल्वेला जोडल्या जाऊन भाविकांना सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे रॉयलसीमा एक्स्प्रेस नांदेडहून सोडावी. राज्यराणी एक्सप्रेसला (Rajyarani Express) अतिरिक्त सहा डबे जोडावेत. सध्या रेल्वेला दररोज गर्दी होत असून अतिरिक्त डबे जोडल्यास मराठवाड्यातील (Marathwada) प्रवाशांची सोय होईल, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com