Video- लाडक्या बाप्पाची घरोघरी प्रतिष्ठापणा, पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्तीला प्राधान्य

शिवचरण वावळे
Saturday, 22 August 2020

आनंदी वातावरणात श्रीगणेशाच्या अगमनाचे स्वागत करण्यासाठी शनिवारी बाजारपेठेत एकच गर्दी उसळली होती. वाढलेल्या गर्दीत कोरोनासारख्या आजाराचे देखील भान नांदेडकरांना राहिले नव्हते. त्यामुळे ‘गर्दी करणाऱ्या भक्तांना बाप्पाला घरी घेऊन जायचे आहे; कोरोनाला नाही’ याचे देखील भान राहिलेले नव्हते.  

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव असतांना देखील शनिवारी (ता.२२) घराघरांमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. सकाळी सात वाजेपासूनच गणेश भक्तांनी स्वतःची सुरक्षा घेऊन गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य खरेदी करण्याला एकच गर्दी केली होती. पर्यावरणाला धोका पोचणार नाही याची खबरदारी घेत प्लास्टर आॅफ पॉरिसच्या श्रीगणेश मूर्ती ऐवजी पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यावर गणेश भक्तांचा भर होता.   

कोरोनाच्या पूर्श्‍वभूमीवर श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा होणार का नाही? झाली तर कशी होईल? हा सर्वच भाविकांसह प्रशासनाला देखील प्रश्‍न पडला होता. मात्र विघ्नहर्ता म्हणून ओळख असणाऱ्या श्रीगणेशाचे पूर्वीच्याच थाटामाटात अगमन झाले. यासाठी शासनाने काही नियम देखील घालुन दिले होते. त्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत सार्वजनिक गणेश मंडळानी दोन ते चार फुट उंचिच्या तर घरातल्या घरात एक ते दोन फुटापर्यंतच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली.  
  
हेही वाचा- Video - वझरा शेख फरीद धबधबा पर्यटकांविनाच कोसळतोय, कुठे ते वाचाच ​

कोरोनामुळे करावे लागलेल्या लॉकडाउनमुळे पर्यावरणात कमालीचे बदल झाले आहेत. यापुढे देखील पर्यावरण असेच स्वच्छ आणि सुंदर रहावे यासाठी थर्माकॉल, कॅरिबॅग सारखे प्रदूषण पसरवणारे कारखाने यापूर्वीच शासनाने बंद केले आहेत. त्या पाठोपाठ प्लास्टीक आॅफ पॉरिसपासून तयार होणाऱ्या श्रीगणेशाच्या मूर्तीवर देखील यापुढे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी आत्तापासूनच पर्यावरणपूरक गणपती मूर्तींची स्थापना करण्याची जणू सवयच लावून घेतली की काय? याचा प्रत्यय शनिवारी बाजारपेठेत बघायला मिळाला. 

मिठाई- मोदकासाठी मिष्ठान भांडारावर गर्दी

लॉकडाऊनमुळे अनेक दिवसापासून बंद असलेल्या मिष्ठान भांडार काही दिवसापासून सुरु करण्या ठेवण्याची मुभा देण्यात आली. मात्र कोरोनाच्या भितीने मिठाई खरेदीसाठी ग्राहक धजावत नव्हते. शनिवारी श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मात्र बाप्पासाठी तयार मोदक आणि उच्चप्रतिची मिठाई खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

हेही वाचा- दाभोलकर - पानसरे हत्येच्या तपासाचे काय? - आमदार राजूरकरांचा सवाल....

फुलबाजार गर्दीने फुलला

फुलशेतीचा मळा फुलला असताना देखील सहा महिण्यापासून फुलांना बाजारात मागणी नव्हती. शेतीतली विविध प्रकारची फुले, फळे झाडांना लागुन जागेवपर कोमेजुन जात होती. मात्र श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चिकु, केळी, शिताफळ या फळांसह दुर्वा, गुलाब, मोगरा, लिली, शेवंती, काकडा अशा विविध प्रकारची फुले विक्रीस उपलब्ध झाल्याने फुल बाजारात मोठी वर्दळ दिसून आली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preferring The Idol Of Lord Ganesha In An Environmentally Friendly Way Nanded News