esakal | धनादेश पाहून प्रकल्पग्रस्त विसरले ३६ वर्षे सोसलेले दुःख
sakal

बोलून बातमी शोधा

mukrmabad.jpg


गेल्या अनेक वर्षापासून मुक्रमाबाद येथील प्रकल्पग्रस्त हे मावेजा मिळविण्यासाठी शासन दरबारी खेटे मारत होते. पण पालकमंत्री अशोक चव्हाण, भाजपाचे आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी सकारात्मक व प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका घेत मुक्रमाबाद येथील एक हजार ३१० घराच्या मावेजा वाटपाला सोमवारी (ता. सहा) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात सुरूवात केली.

धनादेश पाहून प्रकल्पग्रस्त विसरले ३६ वर्षे सोसलेले दुःख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड) : गेल्या अनेक वर्षापासून मुक्रमाबाद येथील प्रकल्पग्रस्त हे मावेजा मिळविण्यासाठी शासन दरबारी खेटे मारत होते. पण पालकमंत्री अशोक चव्हाण, भाजपाचे आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी सकारात्मक व प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका घेत मुक्रमाबाद येथील एक हजार ३१० घराच्या मावेजा वाटपाला सोमवारी (ता. सहा) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात सुरूवात केली.

हेही वाचा -  दीडशे लिटर विदेशी मद्य जप्त, पाच जणांना अटक -


जीव मुठीत घेऊन जगताहेत
मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथील लेंडी नदीवर महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या संयुक्त विद्यमाने १९८४ मध्ये लेंडी धरणाची उभारणी करण्यात आली होती. या धरणात मुक्रमाबाद येथील एक हजार ३१० घरे संपादित करण्यात आली. प्रशासनातील व राजकीय पुढाऱ्यांच्या कुरघोडीत महत्त्वकांक्षी लेंडी प्रकल्प हा गेल्या अनेक वर्षापासून लाल फितीत अडकून पडला होता. शासनाने घरे तर धरणात समाविष्ट करून घेतली पण मावेजा मात्र देत नसल्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना घरे सोडून जाताही येत नव्हते अन् त्या पडक्या घरात राहताही येत नव्हते. जीव मुठीत घेऊन येथील प्रकल्पग्रस्त राहत होता.


अनेक प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती
विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांनी वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत माजी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, प्रशासनातील अधिकारी व प्रकल्पग्रस्तांच्या बैठका घेऊन प्रकल्पग्रस्तांना मावेजा मिळवून देण्याची भूमिका घेतली. त्याचे फलीत म्हणून आज पालकमंञी अशोक चव्हाण यांनी अंतिम रूप देत येथील वार्ड एकमधील प्रकल्पग्रस्तांना मावेजा वाटपाचा धनादेश देऊन प्रत्यक्ष वाटपाला सुरूवात केली. त्यामुळे प्रकल्पग्रस्त १९८४ पासून सोसत असलेल्या वेदना, दुःख धनादेश पाहून विसरून जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहत होता. यावेळी उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार काशीनाथ पाटील, आमदार डॉ. तुषार राठोड, दिलीप पाटील बेटमोगरेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मंडलापूरकर, सरपंच प्रतिनिधी शिवराजअप्पा आवडके, सुरेश पंदिलवार, सुभाषअप्पा बोधने, गंगाधर चामलवाड, राजू पाटील रावणगावकर, बालाजी पसरगे, हेंमत खंकरे, पोलिस पाटील व्यंकट सुवर्णकार यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती होती.


अजूनही प्रतिक्षाच...
शासनाने लेंडी प्रकल्पात मुक्रमाबाद येथील एक हजार ३१० घरे संपादित करून घेत त्याची रचना ही आठ वार्डमध्ये केली असून आज आठ वार्डपैकी एक वार्डमध्ये असलेल्या प्रकल्पग्रस्तांना मावेजा वाटपास सुरूवात केली असून उर्वरीत सात वार्डामधील प्रकल्पग्रस्तांना मावेजा कधी मिळणार.? एक वार्ड मधील प्रकल्पग्रस्तांना मावेजा देण्यासाठी शासनाने तब्बल ३६ वर्षे घालवले तिथे अजून सात वार्डचा मावेजा देण्यासाठी अजून किती वर्षे लागणार..? आता या विचारात सात वार्डमधील प्रकल्पग्रस्त पडले आहेत.

loading image