सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगेविरुद्ध हक्कभंग- आमदार कल्याणकर 

file photo
file photo

नांदेड : येथील सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे हे आपल्या मर्जीनुसार कामे करतात. नुकत्याच एका पुलाच्या कामाच्यावेळी माझ्या मतदार संघातील काम असतानाही माझ्या नाव कुठेच उल्लेख केला नाही. ते सतत अपमानास्पद वागणुक देतात. ही बाब गंभीर असून त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला हक्कभंग मंजुर करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी विधीमंडळात नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्यण्याणकर यांनी केली. त्यांनी मांडलेला हक्कभंग सभआगृहाने मंजूर केला आहे.

हक्कभंग निवेदनात आमदार कल्याणकर म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा नियम २७२ अन्वये मी अविनाश धोंडगे, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांच्याविरुध्द खालील विषयाच्या अनुषंगाने हक्कभंग सूचना देत आहे. सदर प्रकरण आपण पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी विशेष हक्क समितीकडे पाठवावे अशी आपणांस विनंती आहे.
माझ्या नांदेड ( उत्त्तर ) या मतदार संघामध्ये पूरहानी दुरुस्ती फंड ( एफडीआर ) मधील ३० कोटीचा पूल नांदेड डिव्हिजनमध्ये असतांनाही भोकर डिव्हिजन मध्ये टाकण्यात आला आहे. तसेच याकामाच्या उदघाटनाच्या फलकावर ता. २२ जानेवारी २०२१ रोजी कार्यक्रम स्थानिक आमदार म्हणून नावांचा उल्लेख नाही.

तसेच ता. २६ जानेवारी २०२१ रोजी शासकीय विश्रामगृह व अधिक्षक अभियंता कार्यालय (विद्युत) उद्घाटनाच्या कार्यक्रम माझ्या मतदार संघामध्ये होत असतांनाही या कामांच्या फलकांवरही स्थानिक आमदार म्हणून माझा उल्लेख नाही. तसेच या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवरही नावाचा उल्लेख नाही. एवढेच नव्हेतर, कार्यक्रमाचे निमंत्रण कार्यक्रम सुरु होण्याआधी १० मिनिटे आधी सांगण्यात आले.

त्याचबरोबर माझ्या मतदार संघातील काही रस्त्यांची सुमारे ३१० कोटीची कामे विशेष रस्ता दुरुस्ती कामांमध्ये प्रस्तावित करण्यास सांगितले असता सदरची कामे प्रस्तावित करण्यात आली नाही, तर त्याच कामांचा वेगळा प्रस्ताव बजेट प्लेटवर माझे नाव टाकता प्रस्तावित केला.  
माझ्या मतदार संघातील ३२ कोटीची पूलांची कामे मी मंजूर करुन आणली असतांनाही त्यांचे आजपर्यंत अंदाजपत्रक तयार करण्यास अधिक्षक अभियंता हे टाळाटाळ करीत आहेत. तसेच सदरील कामे बदलण्याचाही त्यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. तर ६५ कोटीचा उत्तरी वळण रस्ता माझ्या मतदारसंघात असून त्यांचा १९९० च्या प्लानमध्ये समावेश असून मार्च, २०२० च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेला सदरचा रस्ता नकाशे बदलून भोकर मतदार संघात नेण्याच्या हालचालीही सुरू आहेत.

यासंदर्भात मी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या नात्याने विचारणा केली असता, मला उध्द्टपणाने उत्त्तरे देऊन लोकप्रतिनिधी म्हणून सन्मानजनक वागणूकही देत नाही. अविनाश धोंडगे यांचेवर सीआर नं. १५७/२०१३ मध्ये डांबर प्रकरणांमध्ये हे आरोपी आहेत. ज्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे, त्याच पोलिस स्टेशन हद्दीत श्री. धोंडगे यांचे कार्यालय येत असून त्यामुळे या संदर्भात होणा-या चौकशीमध्ये श्री. धोंडगे वेळोवळी हस्तक्षेप करत आहेत. चौकशीमध्ये अडथळा होत असल्याने त्यांची बदली होणे आवश्यक असतांनाही त्यांची बदली करण्यात आलेली नाही.

मी, माझ्या मतदार संघात लोकहिताची कामे करीत असतांनाही सदरील कामे आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून डिव्हजन बदलून कामे दुस-या डिव्हीजनमध्ये नेऊन माझ्या मतदार संघातील नागरिकांमध्ये माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही शासकीय कार्यक्रमासाठी संबधित विभागातील अथवा मतदार संघातील लोकप्रतिनिधीं शासकीय अधिका-यांनी अथवा शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणा-या कार्यक्रमामध्ये सौजन्यपूर्ण वागणूक देण्याचे तसेच त्यांना याबाबतीत निमंत्रित करणे. या संबधी शासनाने वेळोवेळी विविध परिपत्रके शासन निर्णय तसेच विधानसभा सभागृहात मा. अध्यक्षांनी देखील वेळोवळी शासनाचे तसेच निर्देश अथवा आदेश दिलेले आहेत. असे असतांना वर नमूद केल्याप्रमाणे माझ्या मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये विधानपरिषद सदस्यांना निमंत्रण तसेच उदघाटन फलकांवर नाव टाकण्यात आले आहे व मला स्थानिक लोकप्रतिनिधींनी म्हणून त्या कार्यक्रमापासून वंचित ठेवण्याचा प्रकार त्या माध्यमातून करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदार संघात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असून विशेषाधिकाराचा भंग करणारी असल्याचे माझे ठाम मत आहे.

याकरिता अविनाश धोंडगे, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड त्यांचेविरुध्द प्रस्तुतची विशेषधिकार हक्कभंगाची सूचना मान्य करुन सदर प्रकरण पुढील चौकशीसाठी विधानसभा हक्कभंग समितीकडे पाठवावे                   
- बालाजी कल्याणकर, विधान सभा सदस्य, नांदेड उत्तर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com