अशोक चव्हाणांनी तातडीने थांबवला वाहनांचा ताफा,जखमी तरुणाला केली मदत

जखमी तरुणावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ashok Chavan
Ashok Chavanesakal

अर्धापूर (जि.नांदेड) : नांदेड येथून मालेगावकडे येत असताना खूरगाव पाटी परिसरात जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला आपले वाहन थांबून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पुढाकार घेतला. ही घटना मंगळवारी (ता.२५) दूपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाली. जखमी तरुणावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चव्हाण यांच्या मदतीमुळे तरुणाला वेळेवर उपचार मिळाला आहे. अर्धापूर (Ardhapur) तालुक्यातील विविध विकास कामांचा प्रारंभ व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी सकाळपासूनच धावपळ सुरू झाली होती. या धावपळीतही अशोक चव्हाण यांनी जखमी तरुणाला मदत केली. (Public Works Minister Ashok Chavan Immediately Help Injured Youth In Nanded)

Ashok Chavan
औरंगाबादच्या नामांतरावरून सेना-भाजप समोरासमोर,विमानतळाचा मुद्दा गाजणार!

पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते नांदेड (Nanded) शहरातील विविध विकास कामांचा प्रारंभ करण्यात आले. शहरातील कार्यक्रम आटोपून नांदेडहून मालेगावकडे येत असताना या रस्त्याच्या कडेला मन्मथ धोंडीबा कौठे ( वय २८, रा.बोरगाव, ता.वसमत) हे रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडले होते. या तरुणाकडे चव्हाण यांचे लक्ष गेले. त्यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी नांदेडला नेण्याच्या सूचना केली. जखमी तरुणाला पोलिस ताफ्यातील वाहनातून तातडीने उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Ashok Chavan
'जन्मापूर्वीचा इतिहास शिवसेनेचे इतिहासाचार्य संजय राऊतांना माहिती नसावा'

या जखमी तरूणाची प्रकृती सूधारत आहे. पालकमंत्री चव्हाण यांना धामदरी, गणपूर येथील विविध विकास कामांच्या प्रारंभाच्या कार्यक्रमाला जायचे होते. आधीच उशीर झाला असताना एका जखमीला उपचार मिळावा यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दाखवलेल्या तत्परतेच्या घटनेची माहिती जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी धामदरी (ता अर्धापूर) येथील सभेत दिली. यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर , संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com