esakal | परभणी जिल्ह्यासाठी नविन १६ रुग्णवाहिकांची खरेदी- पालकमंत्री नवाब मलिक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

५० लाख रुपये खर्च करून परभणी जिल्ह्यासाठी १६ नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी (ता.१७) दिली.

परभणी जिल्ह्यासाठी नविन १६ रुग्णवाहिकांची खरेदी- पालकमंत्री नवाब मलिक

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यातील पाच आमदार व दोन खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी ५० लाख रुपये खर्च करून परभणी जिल्ह्यासाठी १६ नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी (ता.१७) दिली.

परभणी जिल्ह्यात रुग्णवाहिकांची संख्या पुरेशी नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात. रुग्णवाहिका नसल्याने गावकुसावरील रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहचविणे आवघड होत असते.  त्यामुळे दोन खासदार व विधीमंडळाचे पाच आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करीत रुग्णवाहिका खरेदी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर सर्व लोकप्रतिनिधीबरोबर चर्चा करतील. तातडीने निधी उपलब्ध होण्या संदर्भात तसेच पोर्टलच्या माध्यमातून त्या रुग्णवाहिका खरेदी करण्या संदर्भात निश्‍चीतच जलदगतीने प्रयत्न करतील असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह जिल्ह्यात

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. त्यामुळे परभणीतील रहिवाशी असलेल्या व मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून नोकऱ्या करणाऱ्या डॉक्टरांना परभणी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात सेवा देण्याची संधी दिली जाणार आहे. 12 ते 14 डॉक्टर्स उपलब्ध झाल्यास निश्‍चीतच कोरोना विरूध्दच्या या लढाईस मदत होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह जिल्ह्यात सर्व नागरी व ग्रामीण क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य पथकांच्या माध्यमातून शनिवारपासून व्यापक सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून कोरोना संदर्भात काही लक्षणे आढळतात का, याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका आयुक्त देविदास पवार, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर आदी अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - नांदेड ब्रेकींग : कोरोना बाधीत ३२ तर ३० रुग्ण बरे, दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली ७७५ वर

आता होम क्वारंटाईनला सुध्दा मुभा

कोरोना विषाणु संसर्गामुळे कॉरन्टाईन केलेल्यांना आता त्यांच्या घरातच बंदिस्त राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे मुभा देण्यात येणार आहे. आसीआरच्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्या व्यक्तींनी होम क्वारंटाईनला प्राधान्य दिले आहे. अशा व्यक्तींना निश्‍चीतच होम क्वारंटाईन प्रशासनाद्वारे परवानगी दिली जाईल. परंतू अश्या घरांना प्रशासनाकडून कुलूपबंद केले जाणार आहे. तसेच त्या घरावर हे व्यक्ती कॉरन्टाईन आहेत असे फलक लावल्या जाणार आहेत. ज्या ठिकाणी शक्य आहे. त्या ठिकाणी काही सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचा विचार प्रशासन करत आहे असे श्री. मलिक यांनी सांगितले.

कोरोनाबाधितांना उपचारासाठी तीन पर्याय

कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोनाबाधित व्यक्तींना उपचाराकरिता काही सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर, जीवनदायी योजनेत समाविष्ट असणा-या खासगी रुग्णालयात सुध्दा रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. तसेच खासगी रुग्णालयात सुध्दा काही खाटा आरक्षीतठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image