इथे तयार होते रोज ४० लिटर दारू

विनोद आपटे
गुरुवार, 30 एप्रिल 2020


कोरोनावर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन हे, आपल्या जिवाची पर्वा न करता दिवस रात्र रस्त्यावर राहून आपले कर्तव्य बजावत असताना मात्र मुक्रमाबाद पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या तांड्यावर हातभट्टी दारूची निर्मिती मोठ्या प्रमाणात करून त्याची शहरात खुलेआम विक्री होत असल्यामुळे पोलिस प्रशासनाचे काम वाढले आहे.

मुक्रमाबाद, (ता. मुखेड, नांदेड) ः लॉकडाऊन असताना शहर व परीसरात अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, यांनी हात भट्टी दारूच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली असून गुरूवारी (ता.३०) रोजी पहाटे आपल्या पथकासह धाडी टाकत दारू निर्मिती करण्यासाठीचे तीनशे लिटर रसायन व चाळीस लिटर अवैध दारू हस्त करत सात जणांवर गुन्हे दाखल केले.

हेही वाचा -  Corona : रिपोर्ट निगेटिव्ह, पण नांदेडमध्ये रुग्णाचा मृत्यू
 

 

कोरोनावर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन हे, आपल्या जिवाची पर्वा न करता दिवस रात्र रस्त्यावर राहून आपले कर्तव्य बजावत असताना मात्र मुक्रमाबाद पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या तांड्यावर हातभट्टी दारूची निर्मिती मोठ्या प्रमाणात करून त्याची शहरात खुलेआम विक्री होत असल्यामुळे पोलिस प्रशासनाचे काम वाढले आहे. यावर आळा घालण्यासाठी मुक्रमाबाद पोलिसांनी आता कंबर कसली असून धडक कारवाई चालविली असून पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, पोलिस उपनिरीक्षक जी.ए. वाघामारे, जमादार शिवाजी आडेकर, रणजीत मुद्दीराज, पठाण, सुरनर, नरबाग, यादवराव, इबितदार यांनी नागराळ व राजुरा तांडा येथे पहाटेच्यावेळी अचानक धाडी टाकत दारू तयार करण्यासाठी शेतात लपऊन ठेवलेले तीनशे लिटर रसायन व चाळीस लिटर अवैध गावठी दारू जप्त करत तेथील दारू अड्डे नष्ट केली केले. दारूची निर्मिती करून त्याची परीसरात विक्री करणारे शंकर चव्हाण, राजू चव्हाण, प्रभू राठोड, शेषेराव राठोड, चांगूनाबाई राठोड, सोनाबाई राठोड, विठ्ठल राठोड, यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल
‘कोरोना’चा वाढता प्रभाव पहाता जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही दुकाने चालू ठेऊ नये असे जिल्हाधिकारी याचे आदेश असतानाही शहरातील गुरू कृपा बिल्डिंग सप्लायर्सचे सचीन इंगळे, फूट वेअर्सचे मालक शेख ईब्राहिम शेख, इरफान, पांडुरंग मशनिअरी इलेक्ट्रिकल्सचे पांडुरंग काळे या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने चालु ठेवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी यांच्यावर मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid On a Liquor Den In Mukramabad, Nanded News