Video- रिपब्लिकन हक्क परिषदेकडून ‘त्या’ घटनेचा निषेध 

फोटो
फोटो

नांदेड : आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या ‘राजगृह’ या डॉ. बाबासाहेबांच्या घरावरील जातीय विकृतीकडून झालेला हल्ला हा आंबेडकरी अस्मितेला डिवचण्याचा प्रकार आहे. या प्रकरणात शासनाने तात्काळ दखल घेऊन आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेश सोनाळे यांनी करुन या घटनेचा गुरुवारी (ता. नऊ) आयटीआय चौकात आपल्या कार्यकर्त्यांसह निषेध केला.

रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीने गुरूवारी (ता. नऊ) आयटीआय चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर राजगृहावर हल्ल्याचा निषेध केला. यावेळी कार्यकर्यानी शासनाच्या नाकर्तेपणाचा व हल्लेखोरांच्या विरोधात घोषणाबाजी केली. लॉकडाउनच्या नियमात राहून व शारिरीक अंतर ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे फौजदार प्रकाश (सोपान) थोरवे यांच्यासह आदी पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर तैणात होते.

राजगृह हे आंबेडकरी समाजाची अस्मिता व दैवत 

मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून घराचे प्रचंड नुकसान केले. देशात व राज्यात सातत्याने आंबेडकरी जनतेवर अन्याय होत आहे. मात्र सामाजीक सलोखा कायम रहावा, जातीय अराजकता माजू नये अशी कायम संयमी भुमिका आंबेडकरी नेतृत्वाने घेतली आहे. पण दुर्दैवाने प्रशासन व शासनाने याला आमच्याकडे नेभळटपणा गृहीत धरुन अनेकदा विद्वेषाची भुमिका घेतली. साक्षिदार असलेले घर राजगृह ज्यात त्यांच्या वास्तव्याचा अनेक खुना आंबेडकरी समाजासाठी कायम प्रेरणा देणाऱ्या आहेत. राजगृह हे आंबेडकरी समाजाची अस्मिता व दैवत आहे. यावरच घाला घालण्याचा केविलवाणा व किळसवाणी प्रकार करुन या प्रवृत्तीने आंबेडकरी अस्मितेला डिवचण्याचा कुटील डाव रचला आहे. याचा रिपब्लिकन हक्क परिषेदेच्या वतीने तिव्र शब्दात निषेध करण्यात आला. 

आंबेडकरी जनतेचे संयम ढळु देऊ नये

हे प्रकरण शासनाने सहज म्हणून घेऊ नये. आंबेडकरी जनतेचे संयम ढळु देऊ नये. यातील हल्लेखोरांना तात्काळ गजाआड करुन त्यांच्या मागे कोणाचा हात आहे हे शोधून काढून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भन्ते पय्यांबोधी, एस. एन. गोडबोले, मधुकरराव गजभारे, फरजान बेगम, शुभम सोनाळे, रोहन लांडगे, वैभव गच्चे, सोनु सूर्यवंशी, राहूल मसुरे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com