
पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधीर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या दौऱ्यावर निघाली आहे.
नांदेड : जवळपास पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधीर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या दौऱ्यावर निघाली आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यात गीताच्या कुटुंबाचा शोध घेण्यात येत आहे.
पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधीर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या दौऱ्यावर निघाली आहे. दोन दशकांपूर्वी कुटुंबापासून ताटातूट झाल्याने लहानपणीच गीता चुकीने थेट पाकिस्तानात पोहोचली होती. यानंतर २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे गीता भारतात परतली होती. आनंद सेवा सोसायटीकडून गीताची काळजी घेतली जात आहे.
हेही वाचाच - नांदेड : एटीएमच्या समावेशमुळे गोदावरी अर्बनची आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल
मध्य प्रदेशच्या सामाजिक न्याय आणि दिव्यांग लोककल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्यानुसार, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या इंदौरमधील आनंद सेवा सोसायटीकडून गीताची काळजी घेतली जाते. या स्वयंसेवी संस्थेवरचा गीताच्या आई वडिलांना शोधण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. गीता मुकी असल्याने तिच्या हावभावावरूनच तिच्या कुटुंबियांना शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. गीताने इशाऱ्याद्वारे आपण राहत असलेल्या भागांसंबंधी काही संकेत दिले आहेत. तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असावीत. दरम्यान, गीता ही तेलगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची प्रशंसक आहे. गीताच्या हावभावानुसार तिच्या घरात इडली, डोसासारखे दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात.
हे देखील वाचाच - Video- नांदेड : लातूर- वारंगा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला एक जानेवारीपासून सुरुवात
कुटुंबाला शोधण्यासाठी गीतासह पथक नांदेडमध्ये
गीताचे कुटुंब हे नांदेड किंवा शेजारील तेलंगणा परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गीताच्या कुटुंबाच्या शोधात एक पथक सोमवारी (ता.१४) नांदेडमध्ये आले आहे. गीताला तिच्या परिवाराचा शोध घेण्यासाठी इंदौर येथील ज्ञानेंद्र पुरोहित, सुमित्रा मुवेल, जालना येथील राज्यस्तरीय कर्णबधीर संस्थेचे मनोज पटवारी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. डी. भारती पुढाकार घेत आहेत.
येथेही क्लिक कराच - करार शेती पध्दतीने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कावर कधीच गदा येणार नाही- पाशा पटेल
असा घेतला जाणार कुटुंबियांचा तपास
तसेच लहानपणीच्या पुसट आठवणींद्वारे गीताने आपल्या गावाजवळ एक रेल्वे स्थानक आणि गावातील नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार सुरुवातीला गीताला नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील रेल्वे स्थानक असणाऱ्या परिसरात आणले जाणार आहे. यानंतर तेलंगाणाच्या सीमाभागात गीताच्या कुटुंबाचा शोध घेतला जाणार आहे. आठवडाभराचा हा दौरा रेल्वे आणि रस्ते मार्गाने होणार आहे. या दौऱ्यात मध्यप्रदेश महिला पोलिसांची एक तुकडी गीता सोबत असणार आहे. शिवाय प्रवासामध्ये स्थानिक पोलिसांची देखील मदत घेतली जाणार आहे.