नांदेड जिल्ह्यातील संदीप भुरे यांची चित्रपट क्षेत्रात भरारी

Nanded News
Nanded News

नांदेड :  जिल्ह्यातील आदमपूर (ता. बिलोली) या गावचा रहिवासी असलेला युवा संगीतकार प्रा. संदीप भुरे यांनी आता मराठी चिञपट क्षेञातही मोठी भरारी घेतलेली आहे. त्यांनी नुकतेच ‘कारं देवा’ या आगामी येऊ घातलेल्या मराठी चिञपटाला संगीत दिले आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली चार गाणी मुंबई येथील स्टुडिओमध्ये ध्वनीमुद्रित केली आहेत. 

एका आदमपूर गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असताना संदीप भुरे यांनी संगीत शिक्षणाचे धडे गुरूवर्य पंडीत प्रा. बाबुराव उप्पलवार यांच्याकडून घेतले आहेत. प्रथमतः संगीत विशारद, 
एम.ए.संगीत शिक्षण त्यांनी आत्मसात केलं. मराठवाड्यातील प्रसिद्ध आंबेडकरी गीतकार वामनदादा कर्डक, बाबुराव जोगदंड, मिलिंद दिवेकर, मोहन नौबते, बालाजी मदन इंगळे, डॉ. जगदीश कदम, प्रा. गोविंद काळे, डॉ. विलासराज भद्रे यासह अनेक नामवंत गीतकरांच्या शब्दांना संगीतबद्ध केलेलं आहे. आकाशवाणीच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक गीते सादर केलेली आहेत.

पुढे मायानगरी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी गीतकार बाबुराव जोगदंड यांच्या अनेक गीतांना संगीतबद्ध करून, कॅसेट, सीडी, बाजारात आणलेल्या आहेत. आजवर त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी महाराष्ट्रातील सिने गायक सुरेश वाडकर, आनंद शिंदे, वैशाली माडे, आदर्श शिंदे, डॉ.नेहा राजपाल, उत्कर्ष शिंदे, मधुर शिंदे, उत्तरा केळकर, शकुंतला जाधव, अजित कडकडे, संजय सावंत, जितेंद्र तुपे, मिलिंद मोहिते इत्यादी नामवंत गायकांनी पार्श्वगायन केलेलं आहे. 

बालपणापासूनच संगीताची आवड
संदीप भुरे यांना बालपणापासूनच संगीताची प्रचंड आवड होती. लहान मोठे संगीत कार्यक्रम करत असताना मराठी, हिंदी अनेक अल्बमला संगीत दिले आहे. नुकत्याच लता मंगेशकर यांच्या स्टुडिओमध्ये फन-टु-क्लास, बाबासाहेबांची आई भीमाई या चिञपटाचेही संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या उत्तुंग भरारीचे कौतुक महाराष्ट्रात होत आहे. ग्रामीण भागातील एका तरूण होतकरू मुलाने संगीत क्षेत्रात काही वेगळे करून दाखवले आहे. आगामी येणाऱ्या या चिञपट निमित्ताने नांदेडमधील या तरुणाचा मुंबईत योग्य सन्मान झाल्याची बाब खूप समाधान देणारी अशीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com