महिलांना उद्योगी व सक्षम करण्यासाठी एसबीआयचा पुढाकार

file photo
file photo

नांदेड : भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्थेच्या ग्रामीण भागातील बेरोजगार महिलांकरिता स्वयं रोजगार आणि कौशल्य विकास अंतर्गत शुक्रवार (ता. आठ) पासून आयोजित दहा दिवसीय दुग्ध व्यवसाय आणि गांढुळ खत निर्मिती प्रशिक्षणास सुरवात झाली आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला एमजीएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी, भाग्यश्री जोशी, राज गायकवाड, आरसेटी संचालक प्रदीप पाटील, प्रशिक्षक आणि कार्यक्रम समन्वयक आशिष राऊत, दिपक कदम हे उपस्थित होते.

या प्रशिक्षणामध्ये दुग्ध व्यवसाय संबंधी तसेच व्यक्तीगत विकास आणि उद्योजकता विकासाचे, कार्यप्रेरणा, आर्थिक साक्षरता इत्यादींचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विविध कार्यक्रम, खेळ आणि क्षेत्र भेटीद्वारा त्यांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करण्यात येत असते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय स्टेट बँक आरसेटी मार्फत आयोजित केला असून प्रशिक्षण कालावधी मध्ये प्रशिक्षणार्थ्यांची राहण्याची, जेवणाची सुद्धा व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.  भारतीय स्टेट बँक आरसेटी नांदेडद्वारा अशा अनेक स्वयंरोजगाराभिमुख कौशल्य विकास अंतर्गत विविध निवासी आणि अनिवासी प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात येते. 

यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर, पापड मसाला बनविणे, कागदी आणि कापडी बॅग बनविणे, शेळी संगोपन, कुकुटपालन, मोबाईल दुरुस्ती, दुचाकी वाहन दुरुस्ती, घरगुती उपकरन दुरुस्ती इत्यादी प्रशिक्षण मोफत आयोजित केले जातात. ज्यामध्ये जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा मोफत केली जाते. या सर्व प्रशिक्षणाचा ग्रामीण भागातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील बेरोजगार युवक युवतींनी लाभ घेण्याचे आव्हाहन संचालक प्रदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन आशिष राऊत तर आभार प्रदर्शन दीपक कदम यांनी आणि कार्यक्रमाच्या यशस्वियेते करिता सहायक संदीप नरवाडे, स्नेहा सारंगधर आणि परिचर मारोती कांबळे यांनी परिश्रम केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com