विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला लागली आग

नांदेड-पूर्णा रस्त्यावरील घटना : अनर्थ टळला
School bus carrying the students caught fire
School bus carrying the students caught fireSakal

नांदेड - एका शाळेतून नांदेडकडे विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या एका स्कूल बसला आग लागली. चालकाने सतर्कता दाखवत बस रस्त्याच्या बाजूला उभी करून विद्यार्थ्यांना खाली उतरवले. त्यानंतर ही आग विझविण्यात आली. अग्निशमन दलाचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. सुदैवाने आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे बसमध्ये वीस विद्यार्थी प्रवास करत होते

शनिवारी (ता.२५) सायंकाळी सहाच्या सुमारास पुर्णा रोड भवानी चौकाजवळ एमएच-२४, जे-७२३९ या स्कूल बसला आग लागली. महापालिकेचे अग्निशमन दल तात्काळ वाहनासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ही आग विझवली. ज्ञानभारती विद्यालय या शाळेची ही बस होती. बसमध्ये २० मुले, वाहन चालक व त्यांचे सहकारी होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चालक व सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना तात्काळ खाली उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान बसमधील बॅटरीमध्ये शाॅर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com