संवेदनशील मनाच्या जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना आधार ....कुठे ते वाचा 

कृष्णा जोमेगावकर | Thursday, 28 May 2020

खरीप हंगाम सन २०२० - २१ साठी पीककर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी संकेतस्थळाला भेट देऊन पीककर्जाची मागणी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले होते. जागतिक महामारी कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. 

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी वेळेवर पिककर्ज मिळावे, यासाठी प्रशासन नियोजन करत आहे. पिककर्ज मागणे हा शेतकऱ्यांच्या हक्कच असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले आहे. संवेदनशील मनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी आधार दिला आहे.  

ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
खरीप हंगाम सन २०२० - २१ साठी पीककर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी संकेतस्थळाला भेट देऊन पीककर्जाची मागणी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले होते. जागतिक महामारी कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी २०२० - २१ या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील पीककर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर (ता. १७ ते २७) मे दरम्यान ऑनलाइन पीककर्ज मागणी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शेतकऱ्यांना केले होते. 

हेही वाचा.....सात दिवसानंतर नागरिकांना दिलासा.....कशामुळे ते वाचा

Advertising
Advertising

एक हजार ७० हजार ऑनलाइन अर्ज
यानुसार ता. १७ ते २७ मे या दहा दिवसांत जिल्ह्यातील एक हजार ७० हजार २४० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळाली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, की पिककर्ज मागणी करणे हा प्रत्येक पात्र शेतकऱ्यांचा हक्क आहे. यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी पिककर्जापासुन वंचित राहू नये यासाठी ऑनलाइन कर्ज मागणी करण्याचे आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पूर्वी बॅंकांकडून शेतकऱ्यांनी आमच्याकडे कर्ज मागणी केली नाही, अशी माहिती दिली जात होती. परंतु यावेळी शेतकऱ्यांना कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने बॅंकांना पात्र खातेदारांना कर्ज वितरीत करावे लागेल. 

हेही वाचलेच पाहिजे......‘एमएसपी’तंर्गत ५६ कोटींचा हरभरा खरेदी

पात्र शेतकऱ्यांची यादी बॅंकांना पाठविणार
ऑनलाइन केलेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी बॅंकांकडे कर्ज वितरणासाठी पाठविण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले. पात्र शेतकरी कर्जापासुन वंचित राहणार नाही, यासाठी बॅंकर्सकडून वेळोवेळी माहिती घेतली जाइल. ऑनलाइन मागणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येइल, यात शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आवाहन केल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलतांना सांगीतले. यात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत संबंधित बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीककर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे.

संदेश प्राप्त होताच बॅंकेकडे जावे
बँकेमार्फत लघुसंदेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधारकार्ड, सातबारा, आठ-अ, फेरफार नक्कल, पॅनकार्ड, टोच नकाशा, पासपोर्ट साईज दोन फोटो, पासबुक या कागदपत्रांसह बँकेत उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले होते. यानुसार (ता. १७ ते २७) मे दहा दिवसांत जिल्ह्यातील एक लाख ७० हजार २४० शेतकऱ्यांनी ऑनलाइन कर्जमागणी अर्ज दाखल केले आहेत. अंतिम पीककर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल, याची संबंधित शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले आहे. यापूढेही शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळेल, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली.