पॉझिटिव्ह रुग्णांची मालिका थांबता थांबेना...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

शनिवारी (ता.२०) सकाळी १८ आणि दुपारी ५८ असे एकुण ७६ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यामध्ये सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पिरबुऱ्हाणनगरातील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दुपारी रहेमतनगरातील एका ४८ वर्षीय व शहिद भगतसिंघरोड येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

नांदेड : शुक्रवारी (ता.१९) घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल शनिवारी (ता.२०) प्राप्त झाला आहे. यात सकाळी एक आणि दुपारी दोन असे तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

शुक्रवारी रात्री उशिराने ८७ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी (ता.२०) सकाळी १८ आणि दुपारी ५८ असे एकुण ७६ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यामध्ये सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पिरबुऱ्हाणनगरातील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दुपारी रहेमतनगरातील एका ४८ वर्षीय व शहिद भगतसिंघरोड येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

हेही वाचा - जिल्ह्यात कोरोनाचा चौदावा बळी ​

रुग्णसंख्येत वरचेवर भर पडत आहे

आठवडाभरापूर्वी जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या फक्त २४ वर आली होती. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे दिसून येत होते. परंतु, मागील काही दिवसांपासून शहरातील रस्ते आणि जिल्ह्याच्या सिमा सैल करण्यात आल्याने पर जिल्ह्यातून शहर आणि गाव खेड्यात मोठ्या प्रमाणावर प्रवाशी दाखल होत आहेत. या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासह इतराना देखील कोरोनाची बाधा होत असल्याने जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वरचेवर भर पडत आहे.  

हेही वाचा- ऑनलाइन पिककर्ज मागणी अर्जासाठी मुदतवाढ ​

बाधितांची संख्या ३०१

शुक्रवारी डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील सहा महिन्याचा एक बालकाने कोरोनावर मात केली. शिवाय डॉ.पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील चार बाधित रुग्ण बरे झाल्याने पाच जणास रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यापाठोपाठ दिवसभरात पुन्हा पाच पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली होती. आतापर्यंत एकूण १८६ व्यक्तींना ते कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. नांदेड शहरातील पिरबुऱ्हाणगर, रहेमतनगर, शहिद भगतसिंघ रोड परिसरातील तीन रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या ३०१ एवढी झाली आहे. 

तर नागपूर, पुणे आणि हैदरबाद येथून आलेले तीन प्रवाशी हे त्या शहरात असतानाच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे तीन पॉझिटिव्ह प्रवाशी नागरिकांची त्या जिल्हा प्रशासनाकडे पॉझिटिव्ह असल्याची नोंद झाली आहे. शनिवारी एका मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित बळींची संख्या १४ इतकी झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Series Of Positive Patients Will Not Stop Nanded News