esakal | नांदेड जिल्ह्यातील शेवडी ते सोनखेड रस्त्याच्या डांबरीकरण; जनतेमध्ये आनंदाचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ग्रामीण भागामध्ये धावणार्‍या बसेसच्या तुलनेत या बसचा महसुल महामंडळास जास्त मिळतो.

नांदेड जिल्ह्यातील शेवडी ते सोनखेड रस्त्याच्या डांबरीकरण; जनतेमध्ये आनंदाचे वातावरण

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : लोहा तालुक्यातील शेवडी (बाजीराव) ते सोनखेड हा रस्त्याचे पक्के डांबरीकरण झाल्याने या रस्त्यावरुन रहदारी करणार्‍या प्रवाशी आणि गावकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

लोहा तालुक्यातील शेवडी (बा.) ते सोनखेड हि दोन गावे सर्कलची गावे असल्याने राजकीयदृष्ट्या तसेच दळणवळणाच्या दृष्टिने महत्वाची मानली जावुन या गावांना वेगळेच महत्त्व आहे. या मार्गावर सोनखेडपासुन साधारणतः 10 ते 12 कि. मी. अंतरावर कपिलेश्वर महादेव मंदिर आहे. त्यामुळे या महादेव मंदिराच्या दर्शनासाठी परिसरातील जवळा, भेंडेगाव, शेलवाडी, येवला पिंपळगाव, मडकी, हारबळ, बेटसांगवी, पेनुर, पारवा, जामगा शिवणी, खडकमांजरी आदी गावांसह नांदेडहुन मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या देवस्थानाला दर सोमवारी मोठ्या प्रमाणात भेट देवुन श्रध्देने दर्शन घेतात. तसेच या रस्त्यावरुन प्रवाशी तसेच शालेय विद्यार्थ्यांना घेवुन नांदेड जवळा ही बस पुर्ण क्षमतेने सारख्या फेर्‍या मारते. 

हेही वाचा - जिंतूरमध्ये वर्षभरात पावणेदोन हजार नागरिकांना कोरोनाची लागण; चाळीस नागरिकांना प्राणास मुकावे लागले

ग्रामीण भागामध्ये धावणार्‍या बसेसच्या तुलनेत या बसचा महसुल महामंडळास जास्त मिळतो. तसेच या रस्त्यावरुन पहाटेपासुनच नांदेडकडे दुधवाल्यांच्या दुचाकी, आॅटो मोठ्या प्रमाणात धावतात. तसेच या जामगा शिवणी परिसरामध्ये धाराशिव साखर कारखाना असल्याने ऊस वाहतुक करणारी ट्रॅक्टर, ट्रक मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरुन धावतात. त्यामुळे ह्या रस्त्यावर सतत वर्दळ दिसुन येते. परंतु हा एवढा वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावरुन वाहतुक करणे मोठे जिकीरीचे वाटत होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतु मोठ्या प्रमाणात कमी होवुन या रस्त्यावरील दळणवळण फार कमी झाले होते. हा रस्त्याचे पक्के डांबरिकरण व्हावे अशी परिसरातील जनतेची बर्‍याच दिवसापासुन लोकप्रतिनिधींकडे मागणी होती. परंतु हा रस्ता दुरुस्तीसाठी योग लागत नव्हता. 

गेल्या काही दिवसामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यास मंजुरी देवुन संबंधीत कंत्राटदाराने हा रस्ता वेळेत आणि मजबुतरित्या पुर्ण केला आहे. या कामासाठी अभियंता जाफर शेख, सत्पाल सिंग, त्यांना सहाय्य करणारे मनोहर कांबळे, मारोती तेलंग, महिला- पुरुष कामगारयांनी निष्ठेने सहाय्य केले. त्यामुळे शेवडी बा. ते सोनखेड हा आठ कि. मी. चा रस्ता मजबुत आणि दर्जेदार बनवल्यामुळे परिसरातील जनतेमध्ये समाधानाचे वातावण निर्माण होवुन या रस्त्यावरुन उत्साहाने प्रवास करत आहेत.

loading image
go to top