esakal | Video : नांदेडला शिवसेना, छावा संघटनेतर्फे कर्नाटक सरकारचा निषेध 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

कर्नाटक राज्यातील मनगुत्ती (ता. बेळगाव) गावातील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटविला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्याचे पडसाद रविवारी (ता.नऊ) सर्वत्र दिसून आले. 

Video : नांदेडला शिवसेना, छावा संघटनेतर्फे कर्नाटक सरकारचा निषेध 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : कर्नाटक राज्यातील मनगुत्ती (ता. बेळगाव) गावातील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटविल्याच्या विरोधात रविवारी (ता. आठ) शिवसेना पक्ष व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शहरातील आयटीआय चौकामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त केला. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आताच्या युवा पिढीने घ्यावा, या हेतूने मनगुत्ती येथील काही नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. परंतु, कर्नाटक सरकारने कुठलीही पुर्वकल्पना न देता हा पुतळा हटविला. परिणामी मनगुत्ती येथील नागरिकांसोबतच महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी रविवारी महाराष्ट्रभर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करून, येत्या चार दिवसात पुतळा पुन्हा होता त्याच जागेवर बसवावा, अन्यथा कर्नाटकमध्ये येवून शिवसैनिक आंदोलन करेल, असा इशाराही आंदोलनकांनी दिला आहे. 

हेही वाचा - नांदेड : आमदार शामसुंदर शिंदेचे कार्यालय फोडले -

शहरातील आयटीआय चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आनंद पाटील बोढारकर, उमेश मुंढे, शहर अध्यक्ष सचिन किशवे, तुळजेश यादव, प्रकाश मारावार, तालुका अध्यक्ष जयवंत कदम, अशोक उमरेकर, अवतारसिंग पहेरेदार, युवा सेना जिल्हाध्यक्ष माधव पावडे, महेश खेडकर, कैलास ठाकूर, ईस्वर जाधव, विजय बगाटे, बळवंत तेलंग, अविनाश ठाकुर, अभिजित भालके, नवनाथ काकडे, श्याम वानखेडे, निकिता शहापूरवाड, डॉ. निकिता चव्हाण, शक्ती ठाकूर उपस्थित होते. 

येथे क्लिक कराच - सावधान : नांदेडमध्ये एका अधिकाऱ्याला दोन लाखाचा ऑनलाईन गंडा

छावा संघटनेतर्फेही निषेध 
मनगुत्ती येथील घटनेचा अखिल भारतीय छावा संघटनेचेच्या वतीने देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनामध्ये प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, जिल्हाअध्यक्ष दशरथ कपाटे, माधवराव ताटे, नितीन गिरडे, स्वप्नील पाटील, सत्तार पठाण, गुरू पाटील, सचिन कंकाळ आदींनी सहभाग घेतला. दरम्यान महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. 

हेही वाचा- शेतकऱ्याचं पोर कमावतो महिण्याला लाखो रुपये, कसे? ते वाचाच ​

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पूर्णकृती पुतळा पुन्हा त्याच जागेवर स्थापन

शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकारी व कर्यकर्तांनी सरकारच्या कृतीचा निषेध करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पूर्णकृती पुतळा पुन्हा त्याच जागेवर स्थापन करावा अशी मागणी देखील केली. नांदेड शहरासह सर्व तालुके आणि गावपातळीवरही आंदोलन करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. 

loading image