esakal | धक्कादायक : पोलिस हवालदाराला मारहाण, फाडले कपडे  
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

रस्त्यात अडवून वाद घलून त्यांना मारहाण केली. ही घटना नविन मोंढा परिसरात रविवारी (ता. १२) दुपारी घडली. तर दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर कारवाई.

धक्कादायक : पोलिस हवालदाराला मारहाण, फाडले कपडे  

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस हवालदारास रस्त्यात अडवून वाद घलून त्यांना मारहाण केली. ही घटना नविन मोंढा परिसरात रविवारी (ता. १२) दुपारी घडली. यानंतर पोलिसांनी मारहाण करण्यास अटक केली. 

शहराच्या नविन मोंढा भागात कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या समोर एक अभ्यासिका आहे. या अभ्यासिकेत झालेल्या चोरीचा तपास करण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार रावसाहेब घुगे हे आपल्या सहकाऱ्यांसह जात होते. यावेळी त्यांना रस्त्‍यातच अडवून वाद घातला. लॉकडाउनचे नियम आम्हाला सांगता काय, मी बाबासाहेबांचा माणुस आहे, तुमची वाट लावून टाकील असे म्हणून अश्‍लिल भाषेत शिविगाळ केली. 

हेही वाचा -  नांदेडकरांना झालय तरी काय...? दंड भरु पण मास्क नको

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एवढेच नाही तर चक्क पोलिसाचे शर्ट धरुन फाडून टाकले. यावेळी पोलिसांनी मारहाण करणारा नितीन टिपरे (वय ३४) याला ताब्यात घेतले. रावसाहेब घुगे यांच्या फिर्यादीवरुन शासकिय कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नितीन टिपरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. डोके करत आहेत. 

गणेशनगरमधील झन्ना- मन्ना जुगारावर छापा 

नांदेड शहराच्या गणेशनगर भागातील मोहन रोपळे यांच्या घरी झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपले पथक कार्यरत केले. या पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख जिया उल हक्क यांनी रविवारी (ता. १२) दुपारी साडेतीनच्या सुमारास कारवाई केली. यावेळी मोहन नारायण रोपाळे, प्रल्हाद रामराव कांबळे रा. मंगलसांगवी, शेख अफ्रोज शेक उस्मान, मच्छिंद्र गंगाधर गीरी आणि एक अन्य यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख सात हजार ३८० रुपये, मोबाईल आणि दुचाकी असा एक लाख पाच हजार ५८० रुपयाचा ऐवज जप्त केला. शेख जिया उल हक्क यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वरील सर्व जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. सूर्यवंशी करत आहेत.

येथे क्लिक करासोयाबीन कंपन्यांच्या अडचणीत वाढ, पुन्हा दोन गुन्हे दाखल

श्रावस्तीनगर भागातही जुगार

याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत श्रावस्तीनगर भागात कॅरम बोर्डच्या पाठीमागे दुसऱ्या झन्ना- मन्ना जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांनी कारवाई केली. यावेळी चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून नगदी व जुगाराचे साहित्य असा पाच हजाराचा ऐवज जप्त केला. रवी वाहूळे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मंबई जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. सानप करत आहेत.