esakal | धोका पत्करून भावासाठी बहीण बाजारात!
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

द्विधा मनःस्थितीत अडकलेल्या बहिणींनी स्वतःची काळजी घेऊन खरेदी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

धोका पत्करून भावासाठी बहीण बाजारात!

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाऊ-बहिणीचा सण रक्षाबंधन आहे. त्यानिमित्त बाजारपेठेत रंगीबेरंगी आणि तेवढ्याच आकर्षक अशा राख्या बाजारात विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. याच राख्या खरेदीसाठी सध्या कोरोनाचा धोका पत्करून बहिणी बाजारात फिरत आहेत. एकीकडे बंधुप्रेम आणि दुसरीकडे कोरोनाचे संकट अशा द्विधा मनःस्थितीत अडकलेल्या बहिणींनी स्वतःची काळजी घेऊन खरेदी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनाने सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम केला आहे. यामध्ये सण-समारंभाचाही समावेश आहे. सगळेच सण-समारंभ शक्‍य तेवढ्या साध्या पद्धतीने साजरे करावे, असे वारंवार आवाहन केले जात आहे. बहीण-भावांचा सण असलेला रक्षाबंधनही यंदा कोरोनाच्या कचाट्यात सापडला असून हा सणही साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आले.

हेही वाचा - नांदेड शहरातील गरीबांच्या घरांसाठी तब्बल 70 कोटींचा निधी- अशोक चव्हाण

मात्र, तरीही बंधुप्रेम असलेल्या काही महिला भाऊरायांसाठी आकर्षक आणि सुंदर, सुबक राखी खरेदी करण्यासाठी बाजारात फिरताना दिसत आहेत. ही बाब धोकादायक असली, तरी तोंडावर मास्क, हाती सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्स पाळून खरेदी करण्यास काहीही हरकत नसली तरी यंदातरी हा सण साधेपणाने साजरा करावा, असे मत सुजाण नागरिकांनी व्यक्त केले आहे.
 
यंदा माहेरी येण्यास निर्बंध
नागपंचमी सणापासून सुरू होत असलेल्या विविध सणांना यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. पूर्वीपासून रक्षाबंधन, गौरी-गणपती आणि दसरा-दिवाळीला सासुरवाशीण महिला माहेरी येत असत; मात्र यंदा कोरोनामुळे एसटी बस आणि जिल्हाबंदी असल्याने यंदा माहेरी येण्यावर निर्बंध असणार आहेत.

हे देखील वाचलेच पाहिजे - जयंती विशेष : साहित्य क्षेत्रातील शुक्रतारा- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
 
फ्रेंडशिप डेलाही फटका
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार म्हणजे जागतिक मैत्री दिवस. ‘तेरी मेरी यारी...’ म्हणत मित्रांसाठी गिफ्ट खरेदी करणे, फ्रेंडशिप बॅंड बांधणे, बाहेर पिकनिकला जाणे हे प्रकार या दिवशी तरुणाई करीत असते; मात्र यंदा या दिवसावरही निर्बंध आले असून, तरुणांनी या दिवशी ऑनलाइन चॅटिंगद्वारे मैत्रीचा दिवस साजरा करणेच हिताचे ठरणार आहे.

loading image
go to top