esakal | म्हणून मी बहिणीला मारले; भावाने केला खुनाचा उलगडा
sakal

बोलून बातमी शोधा

download (2).jpg

तालुक्यातील धनगरवाडी येथे प्रेम प्रकरणाच्या कारणावरून कल्पना केरबा सूर्यवंशी (वय १६) या मुलीला धनगरवाडी शिवारात मारून फेकण्यात आले होते. प्रेमी युगुल भरत गायकवाड यास संशयास्पदरीत्या ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता मी मुलीला मारले नाही, असे सांगितले. पण खरा खुनी कोण आहे याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरविले. मुलीच्या घरातील कुटुंबीयांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता फिर्यादी आई जनाबाई सूर्यवंशी यांनी माझा मुलगा अनिल यानेचा खून केला असल्याचे कबुली दिली. या जवाबवरून अनिल यास पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.

म्हणून मी बहिणीला मारले; भावाने केला खुनाचा उलगडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हनेगाव, (ता.देगलूर, जि. नांदेड) ः धनगरवाडी येथील शिवारात तरुणीचा मृतदेह आढळल्याप्रकरणी मरखेल पोलिसांनी सखोल चौकशी केली असता मृत मुलीचा भाऊच आपल्या बहिणीचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून भाऊ अनिल यास पोलिसांनी अटक केली आहेत.

प्रेम प्रकरणाच्या कारणावरून वाद
तालुक्यातील धनगरवाडी येथे प्रेम प्रकरणाच्या कारणावरून कल्पना केरबा सूर्यवंशी (वय १६) या मुलीला धनगरवाडी शिवारात मारून फेकण्यात आले होते. प्रेमी युगुल भरत गायकवाड यास संशयास्पदरीत्या ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता मी मुलीला मारले नाही, असे सांगितले. पण खरा खुनी कोण आहे याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरविले. मुलीच्या घरातील कुटुंबीयांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता फिर्यादी आई जनाबाई सूर्यवंशी यांनी माझा मुलगा अनिल यानेचा खून केला असल्याचे कबुली दिली. या जवाबवरून अनिल यास पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.

हेही वाचा -  खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना पोलिस कोठडी -

अनिल सूर्यवंशी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा
या वेळी त्याने सांगितले की, माझ्या बहिणीचे भरत नावाच्या मुलाशी प्रेम संबंध होते. यामुळे आमच्या परिवाराची गावामध्ये, नातेवाइकांमध्ये बदनामी झाली आहे. याचा राग माझ्या मनामध्ये होता. यामुळे मी माझ्या बहिणीला मारून टाकल्याची कबुली भावाने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी अनिल केरबा सूर्यवंशी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

खुनामध्ये अजून कोण सहभागी 
खरा आरोपी कोण आहे याचा तपास करण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी मुलीवर प्रेम करणारा मुलगा भरत गायकवाड याच्यामुळे ही घटना घडली आहे. कारण मुलगी ही अल्पवयीन होती, शिवाय त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल होणार हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. खरा आरोपी अनिल यास मंगळवारी (ता. २३) ताब्यात घेतले असले तरी अद्याप आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले नाही. या विषयी तर्क वितर्क लावण्यात येत आहे. भावानेच बहिणीचा हत्या केली असली तरी या खुनामध्ये अजून कोण सहभागी आहेत, हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. पुढील तपास मरखेल ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर हे करीत आहेत.

loading image
go to top