त्याने केला जन्मदात्याचाच घात

download (2).jpg
download (2).jpg


निवघा बाजार, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः येथून जवळच असलेल्या मौजे माटाळा (ता. हदगाव) येथे घरगुती कारणावरून मुलानेच वडीलांचा खून केल्याची घटना मंगळवारी (ता.१२) रोजी सांयकाळी पाच वाजता घडली. या मुळे परीसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

येथून जवळच असलेल्या मौजे माटाळा (ता. हदगाव) हे गाव विदर्भ मराठवाडाच्या सिमेवर पैनगंगा नदी किनारी असून तिनशे लोकवस्तीचे गाव आहे. या छोट्या गावात सर्व लोक गुण्या गोविंदाने नांदतात. याच गावात हरीभाऊ नामदेव दामोदर हे आपल्या परीवारासह मोल मजुरी करून राहतो. बकऱ्या, कोंबडे पाळतो व विक्री करुन संसार चालवतो. परंतू मंगळवारी (ता.१२) रोजी हरीभाऊ दामोदर हे त्यांच्या घरी बसले असता त्यांचा मोठा मुलगा बालाजी दामोदर यांच्यात घरगुती कारणावरुन वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात होऊन संतापाच्या भरात बालाजीने वडिलांच्या डाव्या बरगडीत धारदार  शस्त्राने वार केला. हा वार वर्मी लागल्याने हरीभाऊ जमीनीवर कोसळले. 

लगेच त्यांना त्यांचा भाऊ, पुतन्या यांनी गावातील छोटा एका वाहनाने शिरड येथील डॉ. सुरोशे यांच्याकडे उपचाराकरीता खासगी दवाखाण्यात नेले, परंतू तोपर्यंत ते गतप्राण झाले होते. अशी माहीती पोलिस पाटील गंगाधर जामगडे यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी हदगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अवधूत कुशे, उपनिरीक्षक दिपक फोलाने, जमादार गणपत चव्हाण आदीने घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी बालाजी दामोदर याला अटक करून घटनास्थळावरील तिक्ष्ण हत्यार जप्त केले आहे. अधिक तपास हदगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अवधूत कुशे हे करीत आहेत.

वाळूची चाेरटी वाहतूकप्रकरणी अडीच लाखांचा दंड
मुखेड शहरातून ग्रामीण भागात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवा गाडीस पाेलिसांनी अडवून हटकले असता त्याच्याजवळ काेणताही वाहन परवाना व राॅयल्टी पावती आढळून न आल्याने सहायक पाेलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांनी गाडी ताब्यात घेऊन तहसीलदारांना कळविले असता त्यास अडीच लाख रुपये दंडाची आकारणी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे लाॅकडाऊनमध्येही अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या दीड-दाेन महिन्यांपासून काेराेना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लाॅकडाउन करण्यात आले आहे. यामुळे काेणत्याही वाहनास परवाना असल्याशिवाय फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यातच लाकडाउनचे कठाेर पालन करण्यासाठी साेमवारी (ता. ११) रात्री दीडच्या सुमारास सहायक पाेलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे हे पाळा येथे गस्तीवर असताना मुखेडकडून एक हायवा गाडी (एमएच २६ - बीई ९३००) येत असल्याचे दिसले. काचेवर काेणताही पास प्रथम दर्शनी नसल्याने त्यास हटकले असता बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. त्या वेळी तहसीलदार काशिनाथ पाटील यांचेशी संपर्क करून ही गाडी पाेलिसांनी ताब्यात घेतली. गुरुवारी (ता. १४) जप्त करण्यात आलेल्या गाडीतील वाळूचा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून दाेन लाख साठ हजार रुपये इतका दंड आकारण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातील एस. पी. कांबळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com