esakal | नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाच्या स्पेशल ड्राईव्हमध्ये 394 प्रकरणे निकाली

बोलून बातमी शोधा

file photo}

या स्पेशल ड्राईव्हमध्ये एकूण 783 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकूण 394 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाच्या स्पेशल ड्राईव्हमध्ये 394 प्रकरणे निकाली
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्या मागर्दशनाखाली उच्च न्यायालय, मुंबई यांच्या पुर्व परवानगीने ता. 23 फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालय येथे स्पेशल ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या स्पेशल ड्राईव्हमध्ये एकूण 783 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकूण 394 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

या स्पेशल ड्राईव्हमध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. पी. घोले, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय दुसरे जी. सी. फुलझळके, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय तिसरे एन. एल. गायकवाड, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय चौथे एम. एन. देशमुख, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय पाचवे पी. यु. कुलकर्णी, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय सहावे मुदसर नदीम, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय सातवे एस. आर. बडवे, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय आठवे सहभागी होते.

स्पेशल ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी प्रथम प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड तसेच न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.