esakal | विशेष स्टोरी : रक्ताच्या पलीकडील नाते कोणते ते वाचा...?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

"हॅप्पी क्लब नांदेड़ " तर्फे विधिवत अंत्यसंस्कार करून दफन करण्यात आले आहेत. नांदेडमधील कोरोनाने मृत् पावलेल्या सर्व मृतदेहावर हॅपी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.

विशेष स्टोरी : रक्ताच्या पलीकडील नाते कोणते ते वाचा...?

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : आजपर्यंत कोरोना विषाणूने कोविडग्रस्त चार मृतदेहांना नांदेड (महाराष्ट्र) मधील खडकपुरा येथे दर्गाह दूल्हाशाह रहमान व मशिदीच्या दफनभूमीत "हॅप्पी क्लब नांदेड़ " तर्फे विधिवत अंत्यसंस्कार करून दफन करण्यात आले आहेत. नांदेडमधील कोरोनाने मृत् पावलेल्या सर्व मृतदेहावर हॅपी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. तेही त्या-त्या धार्मीक विधिनुसार. 

सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या आजाराने ग्रस्त आहे. कोरोना विषाणूमुळे ग्रस्त बहुतेक रुग्ण आपल्या नातेवाईकांच्या वागणूकीमुळे या आजाराने    ग्रस्त असताना जगण्याची आशा सोडतात. स्पष्ट आहे आम्ही या रुग्णांना दूर ठेवतो. त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून त्यांना स्पर्शही करण्यास टाळण्यात येतो. याचा परिणाम रुग्णाच्या मानसिकतेवर होवून रूग्णांना त्यांच्या आयुष्याचा शेवट निश्चित असल्याचे स्पष्ट संकेत मिळते.

कोरोना विषाणूच्या मृतदेहाचा जगभर अवहेलना केली जात आहे

आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे की कोरोना विषाणूच्या मृतदेहाचा जगभर अवहेलना केली जात आहे. व त्यांना दुर्लक्षित करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर त्यांना समुद्र किंवा मोठा खड्डा खदून एकत्रितपणे पुरले जात आहे. भीतीमुळे आम्ही मृतांच्या नातेवाईकांशी भेटीगाठी थांबवतो.आपल्या जिवाची परवाह न करता हे शूर तरुण पुढे येत असून जेव्हां मुले आणि जवळच्या नातलग आपल्या रक्तातील नातेवाईकांच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारात भाग घेण्यास टाळतात तेव्हां ही मुले समोर येऊन अंत्यसंस्कार करतात. आम्ही या देशात आणि परदेशात पाहिले आहे आणि वाचले    आहे. की या भीषण साथीमुळे काही समाजसेवेच्या भावनांने प्रेरित तरुण पुढे आले आहेत. निष्ठा व प्रामाणिकपणाने मृतदेहांचे विधिवत अंत्यसंस्कार अग्नी व दफन करीत आहेत.

हेही वाचा -  अर्रारर : कोरोना तपासणी प्रयोगशाळेतच कोरोनाचा शिरकाव

 "हॅप्पी क्लब" नांदेडच्या या मुस्लिम तरुण पुढे

नांदेड (महाराष्ट्र) येथील कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जवळपास ४३ जणांचा बळी गेला आहे, त्यात हिंदू, मुस्लिम आणि विविध जाती-धर्माच्या लोकांचा समावेश आहे. परंतु मोहम्मद शोएब, जिल्हा प्रशासन आणि नांदेड महानगरपालिका यांच्या नेतृत्वात हॅप्पी क्लबच्या एका टीममार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अत्यंत आदरपूर्वक अंत्यसंस्काराची व्यवस्था केली जात आहे. कोण म्हणतो की देशात धार्मिक सौहार्द आणि सद्भावना संपली आहे?  "हॅप्पी क्लब" नांदेडच्या या मुस्लिम तरुणांनी त्यांचे आयुष्य धोक्यात घालून मृत्यूची परवाह न करता देशात मानवतेचे उत्कृष्ट उदाहरण उभे केले आहे. त्यांचे हे महान कार्य शासन पातळीवर पाहिले जात आहे काय? हॅप्पी क्लब, नांदेडच्या या योगदानाबद्दल नांदेडचे लोक नेहमी ऋणी राहतील.