एसटी बस सातच्या आत आगारात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी बस

एसटी बस सातच्या आत आगारात...

नांदेड - प्रवाशांचे हित लक्षात घेऊन एसटी महामंडळाने काळानुरुप एसटी बसमध्ये बदल घडवून आणले. हे खरे असले तरी, आजही रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणच्या मुख्य मार्गावरील गावात रात्री सातनंतर एसटी बस जात नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण होत आहे. महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या एसटीच्या वर्धापनदिन साजरा करत असताना एसटी बसचा सातच्या आत आगारात असाच प्रकास सुरु असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना संसर्गात एसटी महामंडळाला सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोना आटोक्यात येत असतानाच महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण व्हावे, ही मुख्य मागणी करत एसटीतील कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस कामबंद आंदोलन केले. त्यामुळे महामंडळाची एसटी बस अनेक दिवस बंद होती. दरम्यान, महामंडळास दुहेरी आर्थिक फटका बसला आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी आदोलन संपवून कामावर हजर झाल्यापासून अनेक मार्गावर बस सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, असे असले तरी, अनेक बस ह्या नादुरुस्त असल्याने व वर्कशॉपमध्ये पाठवलेल्या बस वेळेवर सेवेत येत नसल्याने रात्रीच्या वेळी जवळच्या जिल्ह्यात बस पाठविल्या जात नाहीत.

शेजारी असलेल्या परभणी, हिगोली, वसमत, औंढा, पूर्णा आदी तालुक्यासाठी देखील रात्री आठनंतर बस उपलब्ध नसल्याची माहिती सुचना कक्षातील एका कर्मचाऱ्याने दिली आहे. सध्या लोहा मार्गावर सर्वाधिक बस धावताना दिसून येतात. त्या प्रमाणात इतर मार्गावर बस पाठविण्यात येत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना मात्र, एसटीची वाट बघत बसण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

सध्या नियमित एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असताना देखील महामंडळाकडुन बस चालविण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने अनेक महत्वाच्या मार्गावर बस सोडल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महामंडळाने बसचे योग्य नियोजन केल्यास सध्या मिळत असलेल्या उत्पन्नापेक्षा महामंडळास जास्तीच उत्पन्न मिळू शकेल, असा विश्वास प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: St Bus Within Seven In Depot Passengers Difficulty

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top